कोल्हापूर: नागपूरमध्ये सुरू असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जलसंधारण खात्यातील भ्रष्टाचारासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला. तारांकित प्रश्नावेळी जलसंधारण मंत्रीसंजय राठोड यांनी सभागृहाची दिशाभूल करणारी माहिती दिली असा आरोप कोल्हापुरातील तक्रारदार अरुण हत्ती यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शासनाची मोठी फसवणूक केली असून या कंपनीविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. असे असताना २०२१ साली जलसंधारण खात्याचे वरिष्ठ अधिकारी सुनील कुशिरे यांनी बेकायदेशीररित्या कंपनीच्या रजिस्ट्रेशनचे नूतनीकरण केले आहे. आलिशान चारचाकी बक्षीस वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने एक आलिशान चारचाकी गाडी बक्षीस म्हणून देण्यात आल्याचा पुरावा तक्रारदार अरुण हत्ती यांनी दाखवला. ही गाडी सुरुवातीला वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन प्राइवेट लिमिटेड या नावावर होती, आता ती गाडी कुशिरे यांचे बंधू दिलीप पांडुरंग कुशिरे यांच्या नावाने ट्रान्सफर केल्याची धक्कादायक बाब अरुण हत्ती यांनी सांगितली.
Web Summary : Minister Sanjay Rathod allegedly misled the assembly regarding irrigation corruption. Complainant Arun Hatti claims a company with criminal cases received illegal registration renewal in 2021. Evidence suggests a luxury car was gifted, later transferred to an official's brother.
Web Summary : सिंचाई भ्रष्टाचार पर मंत्री संजय राठौड़ ने विधानसभा को गुमराह किया। शिकायतकर्ता अरुण हत्ती का दावा है कि आपराधिक मामलों वाली एक कंपनी को 2021 में अवैध पंजीकरण नवीनीकरण मिला। सबूत बताते हैं कि एक लग्जरी कार उपहार में दी गई, जिसे बाद में एक अधिकारी के भाई को हस्तांतरित कर दिया गया।