हळदीतून लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 10:11 PM2020-03-01T22:11:36+5:302020-03-01T22:11:40+5:30

कोपर्डे हवेली : वडोली निळेश्वर, ता. कºहाड येथील शेतकरी बाळासोा श्रीरंग पवार यांनी साठ गुंठे क्षेत्रात अवघ्या दहा महिन्यांत ...

Millions of income from turmeric | हळदीतून लाखोंचे उत्पन्न

हळदीतून लाखोंचे उत्पन्न

Next

कोपर्डे हवेली : वडोली निळेश्वर, ता. कºहाड येथील शेतकरी बाळासोा श्रीरंग पवार यांनी साठ गुंठे क्षेत्रात अवघ्या दहा महिन्यांत हळदीचे उत्पादन खर्च वजा करून सहा लाखांचे उत्पन्न घेतले आहे. त्यांनी केलेल्या शेतीतील क्रांतीमुळे पिकाची सध्या परिसरात चर्चा सुरू आहे.
अलीकडच्या काही वर्षांत हळदीला पिवळे सोने म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. कारण दरही चांगला भेटत आहे. पवार हे गेल्या दहा वर्षांपासून हळदीचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी साठ गुंठे क्षेत्रावर ७७ क्विंटल उत्पादन काढले असून, २० ते २५ क्विंटल बियाण्यांसाठी ठेवले आहे. हळदीच्या पिकात त्यांनी अंतर्गत मका हे पीक घेतले होते. त्यातून त्यांना चांगला नफा मिळाला.
हळदीपूर्व जमिनीची मशागत करताना चारवेळा नांगरट, फनपाळी करून त्यात बारा ट्रॉली शेणखत घातले. चार फुटी सरी सोडून मशीनने हळद पिकाची लागण केली. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापरही केला. त्यामुळे पाण्याचा समतोल साधता आला. रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी औषधाच्या फवारण्याही केल्या. दर तीन महिन्यानंतर बालभरणी केली. तणासाठी वेळोवेळी त्यांनी भांगलण केली.
हळदीची लागण दि. १० एप्रिल २०१९ ला केली तर काढणी दि. १५ जानेवारीला केली. बॉयरलमध्ये हळद उकडून त्याला पॉलीश करून विक्रीसाठी मार्केटला दिली. एका क्विंटलला दहा हजार त्यांना मिळाले आहेत. उत्पादन खर्च वजा करता त्यांनी साठ गुंठे क्षेत्रावरील लागवडीतून सहा लाखांची कमाई केली आहे.
हळद पिकामधून अनेक फायदे
कमी अवधीत जादा उत्पादन देणारे पीक म्हणून अनेक शेतकरी हळद पिकाचा वापर आपल्या शेतीत करू लागलेले आहेत. हळदी पिकात मका, फुले अशी अंतर्गत पिकेही घेता येतात. काही ठिकाणी शेतकरी हळद पीक काढण्याची काही महिने अगोदर त्यामध्ये आंतरपीक म्हणून उसाची लागण करून डबल उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. हळदीचा बिवड इतर पिकास चांगला असल्यामुळे शेतकरी हळद पीक लागणीकडे वळू लागला आहे.
गेल्या दहा वर्षांपासून मी ऊस पिकाबरोबर हळदीचे पीक घेत आहे. हळदीला अपवादानेच एखाद्या वेळेस दर कमी मिळत आहे. अनेकवेळा चांगला दर मिळत असल्याने आमच्या कुटुंबात सधनता आली आहे. यावर्षी साठ गुंठ्यात खर्च वजा करून सहा लाख रुपये मिळाले आहेत.
- बाळासोा पवार, हळद उत्पादक शेतकरी, वडोली निळेश्वर.
वडोली निळेश्वर, ता. कºहाड येथील शेतकरी बाळासोा पवार यांनी हळदीचे पीक घेतले. त्यांना पिकातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळालेले आहे.

Web Title: Millions of income from turmeric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.