शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सैन्य भरतीस प्रारंभ; कोकणासह गोवा राज्यातील उमेदवारांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 14:37 IST

भारतीय सैन्यभरती विभागाच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर आज, गुरुवारी मध्यरात्री पासून सैन्य भरतीस प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्हयांसाठी व गोव्यातील उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबविली गेली. 

ठळक मुद्देभारतीय सैन्य भरतीस प्रारंभकोकणासह गोवा राज्यातील उमेदवारांचा सहभाग

कोल्हापूर : भारतीय सैन्यभरती विभागाच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर आज, गुरुवारी मध्यरात्री पासून सैन्य भरतीस प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्हयांसाठी व गोव्यातील उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबविली गेली. भारतीय सैन्य भरती विभागाच्यावतीने कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्हयासह उत्तर आणि दक्षिण गोवा राज्यासाठी १६ डिसेंबरपर्यंत सैन्यभरती होणार आहे. सैन्यभरती प्रक्रियेसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्हयांसह गोव्या राज्यातील उमेदवारांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.

मध्यरात्री बारा वाजल्या पासून सायबर चौक जवळील विद्यापीठाच्या प्रवेशद्वार येथून उमेदवारांना प्रवेशपत्र पाहून आत सोडण्यात येत होते. त्यानंतर धावणे चाचणी घेण्यात आली. यामधून निवड झालेल्या उमेदवारांची लांब उडी, पाच हजार उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी होतील.

या ठिकाणी त्यांचे धावणे, मैदानी चाचणी घेण्यात आली. पहिल्या टप्प्यांमध्ये निवड झालेल्या प्रत्येक उमेदवारांची बायोमॅट्रिक घेवून पुढील फेरीसाठी पाठविण्यात येत होते. अपात्र झालेल्या उमेदवारांना एन.सी.भवन येथून बाहेर सोडण्यात येत होते. सायबर चौक, सम्राटनगर परिसरात उमेदवारांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

‘व्हाईट आर्मी’तर्फे अन्नछत्रपहिल्या टप्प्यांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांसाठी ‘व्हाईट आर्मी’च्या वतीने मोफत अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी साधारणपणे एक हजार उमेदवारांनी या मोफत अन्नछत्रांचा लाभ घेतला.

 

भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी, नातेवाई व मित्र मंडळीनी सायबर चौक, सम्राट नगर याठिकाणी थांबून, वाहतूक अडथळा न करता राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावरील फ्रि मार्शलिंग एरियामध्ये सर्वांची थांबण्याची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी फिरते शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. येथून या उमेदवारांना भरतीच्या ठिकाणी पाठविले जाणार आहे. तरी सर्व उमेदवार,नातेवाईक व मित्रपरिवारांनी सहकार्य करावे.मेजर सुभाष सासणे,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgoaगोवाsindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरी