कोल्हापूर जिल्ह्यात साडेपाच हजार नागरिकांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 04:25 PM2020-08-08T16:25:03+5:302020-08-08T16:27:35+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे २४ गावांमधील एक हजार ८७८ कुटुंबांतील पाच हजार ५६१ व्यक्तीं व एक हजार १३२ जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

Migration of five and a half thousand citizens in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात साडेपाच हजार नागरिकांचे स्थलांतर

कोल्हापूर जिल्ह्यात साडेपाच हजार नागरिकांचे स्थलांतर

Next
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात साडेपाच हजार नागरिकांचे स्थलांतरसर्वाधिक करवीर तालुक्यातील : जिल्हाधिकारी

कोल्हापूर : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे २४ गावांमधील एक हजार ८७८ कुटुंबांतील पाच हजार ५६१ व्यक्तीं व एक हजार १३२ जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

स्थलांतरित असे : करवीर - एक हजार ७०१ कुटुंबातील चार हजार ८६१ व्यक्ती आणि एक हजार ०३८ जनावरे, महापालिका क्षेत्रातील ५० कुटुंबांतील १७२ गडहिंग्लज- २१ व्यक्ती व १४ जनावरे , आजरा - नऊ, पन्हाळा- १४ गगनबावडा- १०७ व्यक्ती व ३२ जनावरे, चंदगडमधील ३७७ व्यक्ती व ४७ जनावरे, नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

सहा शिबिरांत ४३८ जण

पूरबाधितांसाठी जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी उघडण्यात आलेल्या निवारा शिबिरात १६८ पुरुष, १४२ महिला, तर १२८ लहान मुले अशा ४३८ जणांची सोय करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील एका शिबिरात १७२, गडहिंग्लजमधील शिबिरात १८ आणि चंदगडमधील चार ठिकाणांच्या शिबिरात २४८ जणांची सोय झाली आहे.

Web Title: Migration of five and a half thousand citizens in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.