शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
2
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
3
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
4
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
5
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
6
हनिमूनच्या रात्री नवरी फक्त 'हे' म्हणाली, नवरदेव निघून गेला अन् परतलाच नाही; नेमकं काय घडलं?
7
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
8
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
9
स्मृती मंधानाला चीट केल्याची चर्चा, लग्नही पुढे ढकललं; सर्व प्रकारानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला
10
चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
11
समांथा रुथ प्रभूने गुपचुप केलं दुसरं लग्न? 'द फॅमिली मॅन'च्या दिग्दर्शकासोबत संसार थाटल्याच्या चर्चा
12
वरमाला झाली, वधू स्टेजवरून उतरली... अन् थेट प्रियकरासोबत पळून गेली! सप्तपदीपूर्वीच लग्नात मोठा राडा
13
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठी आर्थिक विधेयकं संसदेत मांडली जाणार
14
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार?
15
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
16
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
17
भावा जिंकलस! 'बिग बॉस १९'च्या टॉप ५मध्ये पोहोचला प्रणित मोरे, 'या' दिवशी पार पडणार ग्रँड फिनाले
18
"भाऊ, मी तुलाही मानतो...", रितेश देशमुखच्या 'त्या' प्रश्नावर प्रणित मोरेने दिलं उत्तर; पाहा Video
19
New Rules 1 December 2025: आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
20
Sunil Gavaskar: सचिन तेंडुलकर की कोहली? वनडेतील सर्वोत्तम फलंदाज कोण? गावस्कर म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांची बैठक : ठाण्याच्या बैठकीत जो निर्णय होईल तो मान्य

By admin | Updated: June 27, 2014 01:19 IST

एलबीटीप्रश्नी ‘नो उल्लू बनाविंग’

कोल्हापूर : राज्य शासनाने निवडणुकीच्या तोंडावर एलबीटी न हटविता, फक्त पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता एलबीटी प्रश्न सोडविण्यासाठी शासनावर दबाव टाकू या. शासनाने पुन्हा-पुन्हा व्यापाऱ्यांना ‘उल्लू’ बनविण्याचा प्रयत्न न करता हा प्रश्न तडीस लावावा. शिवसेना-भाजपकडूनही एलबीटीला पर्याय नाही, तर पूर्णपणे मागे घेण्याबाबत विचारणा करू, असे आश्वासन दिले आहे. उद्या शुक्रवारी ठाण्यातील होणारा निर्णय येथील सर्व व्यापाऱ्यांना मान्य असेल, असे आज गुरुवारी व्यापारी-उद्योजकांनी उद्यमनगर येथील इंजिनिअरिंग असोसिएशनच्या हॉलमध्ये झालेल्या बैठकीत ठरले.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सचिव स्तरावर बैठक घेऊन एलबीटी ऐवजी शहर विकास कर (सीडीसी) असे नाव देऊन या कराची वसुली विक्रीकर विभागाकडे देण्याचे सूतोवाच केले आहे. याबाबत ठाणे येथे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी राज्यस्तरीय व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी उद्या ठाण्यात बैठक होणार आहे. या बैठकीच्या तयारीबाबत व्यापारी व उद्योजकांनी चर्चा केली. बैठकीसाठी सदानंद कोरगावकर हे व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून हजर राहणार आहेत. व्यापारी महासंघाचे निमंत्रक सदानंद कोरगावकर यांनी राज्यातील व्यापारी गेली चार वर्षे एलबीटी (स्थानिक संस्था कर) विरोधात आंदोलन करीत आहेत. मात्र, शासन याबाबत ठोस निर्णयाप्रत पोहोचलेले नाही. एलबीटीबाबत शासन सकारात्मक नाही, यामुळे उद्याच्या बैठकीतूनही फारसे निष्पन्न होण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त केला. यावेळी प्रदीप कापडिया, अमर क्षीरसागर, रवींद्र तेंडुलकर, सुरेश गायकवाड, गणेश बुरसे, कमलाकर कुलकर्णी, देवेंद्र ओबेरॉय, आदी उपस्थित होते.