कोल्हापूरकरांनी जागवल्या सुंदरलाल बहुगुणा यांच्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 07:41 PM2021-05-21T19:41:32+5:302021-05-21T19:43:54+5:30

environment Kolhapur : चिपको आंदोलनाचे प्रणेते, वृक्षमित्र, ज्येष्ठ पर्यावरणवादी पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाचे वृत्त कळताच कोल्हापूरातील पर्यावरणप्रेमी आणि पत्रकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Memories of Sunderlal Bahuguna awakened by the people of Kolhapur | कोल्हापूरकरांनी जागवल्या सुंदरलाल बहुगुणा यांच्या आठवणी

कोल्हापूरकरांनी जागवल्या सुंदरलाल बहुगुणा यांच्या आठवणी

Next
ठळक मुद्देकोल्हापूरकरांनी जागवल्या सुंदरलाल बहुगुणा यांच्या आठवणीपर्यावरणप्रेमी आणि पत्रकारांनी दिला आठवणींना उजाळा

कोल्हापूर : चिपको आंदोलनाचे प्रणेते, वृक्षमित्र, ज्येष्ठ पर्यावरणवादी पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाचे वृत्त कळताच कोल्हापूरातीलपर्यावरणप्रेमी आणि पत्रकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सुंदरलाल बहुगुणा ऑगस्ट २००० मध्ये तीन दिवस कोल्हापूरात होते. ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, पत्रकारितेचे विद्यार्थी असताना त्यांची भेट घेणारे राजेंद्र भस्मे, चित्रकलेच्या माध्यमातून संपर्क साधणारे चित्रकार विजय टिपुगडे आणि ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी बहुगुणा यांच्या आठवणी लोकमतशी बोलताना सांगितल्या.

कोल्हापूरात ऑगस्ट २००० मध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन आणि कोल्हापूरातील पर्यावरण चळवळीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. स्टेशन रोडसमोरील एका माडीच्या घरात त्यांची भेट झाल्याची आठवण ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी सांगितली. सत्काराच्या निमित्ताने पुष्पहार न घालता फळांचा हार घालावा, अशी सूचना त्यांनी दिल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

्ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र भस्मे यांनीही बहुगुणा यांच्या भेटीची आठवण सांगितली आहे. शिवाजी विद्यापीठात १९८९- ९० मध्ये बीजेसीच्या तुकडीने मार्च महिन्यात दिल्लीत एक अभ्यास दौरा आयोजित केला होता, त्यावेळी उपपंतप्रधान देविलाल होते. या दौऱ्यादरम्यान १६ मार्च १९९० रोजी एका सायंकाळी पीटीआयच्या कार्यालयात कर्मधर्मसंयोगाने चिपको आंदोलनाचे नेते सुंदरलाल बहुगुणा यांची भेट झाली होती. त्यावेळी ॲड्रेस बुकमध्ये त्यांनी सही करुन आपली लेखणी मूक निसर्ग आणि मानवाला वाणी देणारी ठरो, असा संदेश दिला होता.

कोल्हापूरात २००० मध्ये एका प्रदर्शनात ज्येष्ठ चित्रकार विजय टिपुगडे यांनी काढलेल्या चित्राचे त्यांनी कौतुक केले होते. त्याच्या आठवणी टिपुगडे यांनी सांगितल्या आहेत. कोल्हापूरात २००० मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बहुगुणा यांच्या हस्ते झालेल्या सत्काराची आठवण ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी सांगितली.

यावेळी बाचुळकर यांनी जमा केलेल्या २८० औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन बहुगुणा यांनी केले होते. खाणकाम विरोधी आंदोलनामुळे बाचुळकर यांचे त्यांनी कौतुक करुन स्वहस्ताक्षरातील एक कविता भेट दिल्याचे बाचुळकर यांनी सांगितले. केवळ संशोधन न करता प्रत्यक्ष चळवळीत काम करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी शिक्षकांना केले होते.

Web Title: Memories of Sunderlal Bahuguna awakened by the people of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app