कणेरी मठावर आरएसएसची बैठक, सरसंघचालक मोहन भागवत बैठकीस उपस्थित राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 19:26 IST2021-11-30T11:07:06+5:302021-11-30T19:26:57+5:30
बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस ही बैठक चालेल.

कणेरी मठावर आरएसएसची बैठक, सरसंघचालक मोहन भागवत बैठकीस उपस्थित राहणार
कोल्हापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय समितीची बैठक मंगळवारपासून येथून जवळच असणाऱ्या कणेरी येथील सिद्धगिरी मठावर होत आहे. तीन दिवस ही बैठक चालेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय समितीची अशी बैठक वर्षातून तीन ते चार वेळा होते.
या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह कृष्णगोपाल, डॉ. मनमोहन वैद्य, अरुणकुमार, सुरेश सोनी, रामदत्त हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये वर्षभरातील संघाच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. पुढील वर्षी करण्यात येणाऱ्या संघटनात्मक कामाचे नियोजनही केले जाईल. २०२५ साली संघाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त प्रत्येक विभागामध्ये कोणते कार्यक्रम घ्यायचे याचेही नियोजन या बैठकीत करण्यात येईल, अशी माहिती रा.स्व. संघाच्या प्रचार विभागाकडून देण्यात आली आहे.