'करवीर' पंचायत समिती सभापतीपदी कळंब्याच्या मीनाक्षी पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:37 IST2021-02-23T04:37:48+5:302021-02-23T04:37:48+5:30
विद्यमान सभापती अश्विनी कृष्णा धोत्रे यांनी नेत्यांनी ठरवून दिलेला सव्वावर्षाचा कार्यकाल संपल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे ...

'करवीर' पंचायत समिती सभापतीपदी कळंब्याच्या मीनाक्षी पाटील
विद्यमान सभापती अश्विनी कृष्णा धोत्रे यांनी नेत्यांनी ठरवून दिलेला सव्वावर्षाचा कार्यकाल संपल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद एक महिना रिक्त राहिले होते. सभापतीपदासाठी मीनाक्षी भगवान पाटील यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. करवीर पंचायत समितीवर पालकमंत्री सतेज पाटील व आ. पी. एन. पाटील गटाची सत्ता आहे. एका गटाला सभापती, तर दुसऱ्या गटाला उपसभापती पदाची संधी दिली जाते. नूतन सभापती पाटील या पालकमंत्री सतेज पाटील गटाच्या आहेत. यावेळी प्रभारी सभापती सुनील पोवार, सागर पाटील, विजय भोसले, अविनाश पाटील, इंद्रजित पाटील, रमेश चौगले, चंद्रकांत पाटील, शोभा राजमाने, अश्विनी धोत्रे, अर्चना खाडे, सविता पाटील, राजेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते
कोट : पालकमंत्री सतेज पाटील यांच्यामुळे आपणास सभापतीपदाची संधी मिळाली. पंचायतचे सर्व सदस्य, सदस्या यांना सोबत घेऊन आपण पंचायतीचा कारभार करू. मीनाक्षी पाटील, नूतन सभापती.
फोटो: १) २२ मीनाक्षी पाटील
२) २२ मीनाक्षी पाटील १- निवड जाहीर होताच नूतन सभापती मीनाक्षी पाटील यांना पती भगवान पाटील यांनी असे उचलून घेऊन आनंद व्यक्त केला.
( फोटो रमेश पाटील ,कसबा बावडा )