शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

जंगली गव्याचे प्राण वाचविण्यात वनविभागाच्या वैद्यकीय पथकाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 5:23 PM

ForestDepartment Wildlife Kolhapur : जंगलातुन मानवीस्तीकडे आलेल्या व पळून दमछाक झालेल्या रानगव्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यानी औषधो उपचार करून जीवदान दिले आहे . त्यामुळे पर्यावरण प्रेमीतुन वनकर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे. 

ठळक मुद्देजंगली गव्याचे प्राण वाचविण्यात वनविभागाच्या वैद्यकीय पथकाला यश५० तासांची मॅरेथॉन उपचारांची शर्थ

राजू कांबळे  /विकास शहा

मलकापूर/शिराळा : जंगलातुन मानवीस्तीकडे आलेल्या व पळून दमछाक झालेल्या रानगव्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यानी औषधो उपचार करून जीवदान दिले आहे . त्यामुळे पर्यावरण प्रेमीतुन वनकर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे. नागरीकांना गव्यांना हुसकावण्या साठी आरडा ओरडा केला असता गवे कडवी नदीतुन पेरीड  ( ता . शाहूवाडी ) गावच्या शिवारात गेले त्यातील एक गवा पळता , पळता पेरीड गावच्चा शिवारात पडला होता .

 मंगळवारी सकाळी मलकापूर शहरातील राजवाड्याजवळ आलेल्या चार गव्यांना पूर्ववत जंगलाच्या दिशेने हुसकावताना यातील दोन वर्षांचा गवा वाट चुकून सैरभैर पळाल्यामुळे शरीरातील पाणी व क्षार कमी होऊन निपचित पडला होता .त्याला उठता येत नव्हते वनकर्मचाऱ्यांनी त्याला भूलीचे इंजेवशन देऊन टॅक्टर मध्ये सोडले .  दरम्यान , गव्याचे डी - हायड्रेशन , अतिउष्णतेमुळे वाढलेली हृदयाची स्पंदने तातडीने कमी करण्यासाठी मलकापूर पालिकेचा अग्निशमन बंब पाचारण करण्यात आला . पाण्याच्या फवाऱ्याद्वारे गव्याच्या शरीराचे तापमान नियंत्रणात आले . परंतु , प्रकृती खालावत चालल्यामुळे स्थानिक पशुवैद्यकाच्या मदतीने काही सलाईन व प्रतिजैविकांची मात्रा दिली गेली 

पशुवैधकीय अधिकारी डॉ संतोष वाळवेकर यांना बोलावून त्याला सलाईन चढविण्यात आले . त्यामुळे गव्याची तब्बेत सुधारू लागली आहे. गव्याच्या रक्षणासाठी मलकापूर वनविभागाचे पाच कर्मचारी रात्र दिवस पहारा देत आहेत . गेले तीन दिवस जंगली गव्यावर उपचार सुरु आहेत.

त्याचा जीव वाचविण्यासाठी वनविभागाला ग्रामस्थांच्या मदतीने  वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गव्यावर कलेल्या उपचारामुळे गव्याला जीवदान मिळाले आहे . पेरीड ग्रामस्थांनी मोलाची मदत केली असल्याचे नंदकुमार नलवडे यांनी सांगितले. हा गवा अद्यापही पेरीड गाडेवाडी जवळच्या जंगलात वैद्यकीय पथकाच्या निगराणीत  आहे.  गव्याला जीवदान देण्यासाठी  वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे , डॉ . माळी , खोत , वनपाल संजय कांबळे , राजाराम राजीगरे , वनरक्षक जालंदर कांबळे , किरण खोत ,विठ्ठल वारकरी , शाहिद मिस्त्री , बाळू भोसले यांनी यासाठी परिश्रम घेतले . 

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूरSangliसांगली