शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील मटका बुकी सम्राट कोराणे अखेर अटकेत, तपासाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 12:29 IST

समर्थकांची कळंबा कारागृहासमोर मोठी गर्दी

कोल्हापूर : जिल्हा न्यायालयात शरण आलेला मटका बुकी सम्राट सुभाष कोराणे (वय ४२, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) याला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता, १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्याचा ताबा राजारामपुरी पोलिसांकडे दिला आहे. दरम्यान कोराणे समर्थकांनी कळंबा कारागृहासमोर मोठी गर्दी केली होती. मोठ्या पोलिस बंदोबस्तात त्याला कळंबा कारागृहातून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय ते न्यायालयात नेण्यात आले.कोराणे याचा ताबा मिळवण्यासाठी शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी गुरुवारी न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यानुसार शुक्रवारी सकाळी ११ वाजता कळंबा कारागृहातून कोराणे याचा ताबा घेतला. त्याचा ताबा घेताना समर्थकांनी कळंबा कारागृहासमोर मोठी गर्दी केली. पोलिसांनी ही गर्दी पांगविली. त्यानंतर त्याची सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी केली. तेथून कसबा बावडा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात मोठ्या पोलिस बंदोबस्तात नेण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांच्यासमोर त्याला हजर केले असता १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.यादवनगर येथील मटका अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी मटका बुकींची पाळेमुळे खणून काढली होती. एप्रिल १०१९ मध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून मटका बुकी सम्राट कोराणे फरार होता. या गुन्ह्यातील ४४ पैकी ४२ संशयितांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली (मोका) पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. फरार आरोपी कोराणे बुधवारी स्वत:हून न्यायालयात शरण आला होता. त्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती.रात्री उशिरापर्यंत तपास सुरूकोराणेचा ताबा राजारामपुरी पोलिस ठाण्याकडे आहे. रात्री उशीरा तपास अधिकारी उपअधीक्षक अजित टिके यांनी कोराणे याच्याकडे तपास केला. गेली सहा वर्षे तो कुठे होता?, त्याला कोणी आश्रय दिला?, यात काही राजकीय व्यक्तींचा सहभाग होता काय?, त्याचे कोणाशी लागेबांधे होते?, याची माहिती घेतली जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस