सचिन यादवकोल्हापूर : राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक-वाहकांनी हिशेबात एक रुपयाचा घोळ केल्यास त्याला तत्काळ निलंबित केले जाते. रात्री बारा वाजेपर्यंत अधिकारी थांबून त्यांच्या निलंबनाचा आदेश काढतात. मात्र, विभाग नियंत्रक सुटीवर असताना ४३ लिपिक-टंकलेखकांचे बदली आदेश परस्पर काढल्याप्रकरणी कार्यभार काढून घेतल्याची फुटकळ कारवाई केली आहे. बदली प्रकरणातील मास्टरमाइंडवर कारवाईची मागणी एसटी संघटनांकडून होत आहे.कोल्हापूर विभागातील एसटीतील लिपिक-टंकलेखकांच्या गेल्यावर्षी तयार केलेले आदेश यावर्षी परस्पर काढण्यात आले. या आदेशावर एका अधिकाऱ्याची सही आहे. त्यांनी ते आदेश बारा आगारांना चुकून काढल्याचे सांगितले आहे. गेल्या दहा वर्षांत हिशेबात दोन, पाच रुपये आणि दहा रुपये कमी असल्याचे कारण दाखवीत काही चालक आणि वाहकांवर ठपका ठेवून त्यांना निलंबित केले आहे. मग आता या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न कर्मचारी विचारत आहेत.
निलंबनाचे आदेश तयार; पण..मुंबईत परिवहनमंत्र्यांकडे एसटीच्या काही संघटनांनी संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली. त्यांच्या निलंबनाचे आदेश तयार करण्यास सांगितले. मात्र, प्रत्यक्षात तसे काही आदेश निघालेच नाहीत. तिथे काय चावी फिरली अशी विचारणा होत आहे.
दोन महिलांची समितीप्रादेशिक व्यवस्थापक, सनियंत्रण समितीने कोल्हापूरच्या बदली प्रकरणी दोन महिलांची समिती स्थापन केली आहे. त्यात सातारा विभागातील विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी शुभांगी धुमाळ आणि पुणे विभागातील आस्थापना पर्यवेक्षक जयाप्रदा फड यांची नियुक्ती केली आहे. त्यासह मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी सोमनाथ तिकोटकर यांची चौकशी समिती स्वतंत्र तपास करणार आहे.
चौकशीसाठी समकक्ष अधिकारीविभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी पदाचा कार्यभार गीतांजली सूर्यवंशी यांच्याकडून काढून घेतला. त्यांचे मूळ पद आस्थापना पर्यवेक्षक आहे. त्यांची चौकशी करण्यासाठी पुणे विभागातून समकक्षच आस्थापना पर्यवेक्षकांची नियुक्ती केली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बदली प्रकरणी नेमलेली समिती केवळ फार्स आहे. बदली प्रकरणात अधिकारी दोषी असल्याचे स्पष्टपणे उघड होत आहे. त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी पुन्हा परिवहनमंत्र्यांकडे पाठपुरावा करू. - श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस
Web Summary : Despite evidence of wrongdoing in unauthorized ST employee transfers, the key figure remains unpunished. Unions are aggressively pushing for suspension. An internal inquiry is ongoing, but unions criticize it as inadequate, demanding immediate action against the responsible officer.
Web Summary : अनधिकृत एसटी कर्मचारी स्थानांतरण में गलत काम के सबूत के बावजूद, प्रमुख व्यक्ति अभी भी दंडित नहीं हुआ है। यूनियन निलंबन के लिए आक्रामक रूप से दबाव डाल रहे हैं। एक आंतरिक जांच चल रही है, लेकिन यूनियनों ने इसे अपर्याप्त बताते हुए जिम्मेदार अधिकारी के खिलाफ तत्काल कार्रवाई की मांग की है।