मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरांचा कोल्हापूरला सरप्राईज दौरा, नृसिंहवाडीत घेतले दत्त दर्शन
By समीर देशपांडे | Updated: October 31, 2022 13:11 IST2022-10-31T12:39:10+5:302022-10-31T13:11:14+5:30
सकाळी तेंडुलकर वाडीत येवून गेल्याचे समजल्यानंतर मात्र नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला.

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरांचा कोल्हापूरला सरप्राईज दौरा, नृसिंहवाडीत घेतले दत्त दर्शन
कोल्हापूर: मास्टरब्लास्टर, प्रख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आज, सोमवारी पहाटे अचानक नृसिंहवाडीत श्री दत्त मंदिरामध्ये हजेरी लावली. पहाटे पाच वाजता आलेले तेंडुलकर हे पहाटेच्या काकड आरतीला उपस्थित राहून परत मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा असल्याची माहिती मिळाली. त्या दोघांनाही मास्क घातल्याने त्यांना कोणीही ओळखले नाही. काकड आरतीकरुन ते मुंबईला परतले. सकाळी तेंडुलकर वाडीत येवून गेल्याचे समजल्यानंतर मात्र नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला.
उद्योजक तेज घाटगे यांचे बंधू गौरव घाटगे यांनी तेज यांना फोन करून सांगितलं की त्यांचे जवळचे आणि खास पाहुणे येणार असल्याची माहिती दिली. ते मुक्कामाला येणार आहेत. तुम्ही मुडशिंगीच्या फार्म हाऊसवर थांबा असे त्यांनी सांगितले. परंतू त्यांचे नाव सांगितले नाही. रात्री दहाच्या सुमारास गाडीतून तेंडुलकर उतरले आणि घाटगे परिवाराला एकदम आश्चर्याचा धक्का बसला.
रात्री कोल्हापुरी पाहुणचार घेवून मुक्काम करून पहाटे चार नंतर तेंडुलकर नृसिंवाडीकडे रवाना झाले. तेथे काकड आरतीला उपस्थित राहून ते लगेच तिथून निघाले. तेज घाटगे यांनी सकाळी सचिन यांच्यासोबतचा फोटो शेअर केल्यानंतर याबाबत सर्वांना माहिती झाले.