शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

विमा फसवणुकीचा ‘मास्टर माइंड’ मोरेवाडीचा

By admin | Updated: June 29, 2015 00:47 IST

शक्ती माटुंगेसह तिघे फरार : अनेक बड्या धेंडांची नावे पुढे येण्याची शक्यता

एकनााथ पाटील - कोल्हापूरविमा फसवणूक प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. काही राजकीय लोकप्रतिनिधींचाही या प्रकरणात समावेश असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत बोगस विमा पॉलिसीचे रॅकेट चालविणारा ‘मास्टर माइंड’ मोरेवाडीचा आहे. संशयित शक्ती दिलीप माटुंगे (रा. मोरेवाडी) असे त्याचे नाव आहे. पोलीस रेकॉर्डवर ‘वाँटेड’ असलेल्या हा ‘शक्ती’ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर अनेक बड्या धेंडांची नावे पुढे येणार आहेत. मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना पैशांचे आमिष दाखवून मृताच्या नावे विमा पॉलिसी उतरवून लाखो रुपये कमाविणाऱ्या रॅकेटचा डाव लक्ष्मीपुरी पोलिसांनी उजेडात आणला आहे. या प्रकरणी विमा कंपनीच्या सेल्स मॅनेजरसह डॉक्टर, मृताचे नातेवाईक, एजंटांना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणाचा ‘मास्टर माइंड’ अजूनही मोकाटच फिरत आहे. आलिशान बंगल्यात राहणाऱ्या ‘मास्टर माइंड’ने सुरुवातीस मोरेवाडीतील केदारनगर परिसरात एक नव्हे, तर तब्बल सात हातभट्ट्या सुरू केल्या. त्या सुरू करण्यासाठी त्याने खाकी वर्दीशी हातमिळवणी केली. हळूहळू त्याने जोडधंदा म्हणून जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला. वादविवादाच्या जमिनींचे व्यवहार करून त्याने त्यामधून लाखो रुपये मिळविले. अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळू लागल्याने त्याची चैनी वाढली. त्याने मित्र छगन भाट (रा. कंदलगाव) याच्या मदतीने विमा कंपन्यांना हाताशी धरून मृत व्यक्तींच्या नावे बोगस पॉलिसी काढून लाखो रुपये कमविण्याची शक्कल लढविली. त्यासाठी या दोघांनी डॉक्टर, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, ग्रामसेवक या यंत्रणेसह मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना हाताशी धरून लाखो रुपये मिळविण्यास सुरुवात केली.मृत व्यक्ती शोधण्यासाठी त्यांनी एजंटांचे जाळेही जिल्ह्णात पेरले आहे. मृतांच्या टाळूवरील लोणी खाऊन कोट्यवधी रुपयांची माया मिळविणारा ‘मास्टर माइंड’ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर अनेक बड्या धेंडांची नावे पुढे येणार आहेत. त्याच्यासह त्यांचे साथीदार छगन भाट, सचिन मछले (मोतीनगर), बिनाबाई भाट (शहापूर), आदी फरार आहेत. बोगस विमा पॉलिसी फसवणूक प्रकरणात संशयित शक्ती माटुंगे हा मुख्य सूत्रधार आहे. तो व त्याचे अन्य साथीदार पसार असून, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत. - एस. एस. पांचाळ, पोलीस उपनिरीक्षक