मुलांना एकच आधार, मुलगी चालेल निराधार; महिला आधारगृहांकडे वरपित्यांची लागली रीघ

By विश्वास पाटील | Updated: March 22, 2025 08:26 IST2025-03-22T08:23:26+5:302025-03-22T08:26:01+5:30

मुलाचे वय जास्तीत जास्त २८ असेल तरच त्याचा 3 बायोडाटा स्वीकारला जातो. लग्नात मुलीच्या पसंतीला महत्त्व असते. एचआयव्हीपासून सर्व आरोग्य तपासण्या कराव्या लागतात. आर्थिक स्थिती तपासली जाते.

Marriage issue Women's support houses have become a source of trouble for groom fathers | मुलांना एकच आधार, मुलगी चालेल निराधार; महिला आधारगृहांकडे वरपित्यांची लागली रीघ

मुलांना एकच आधार, मुलगी चालेल निराधार; महिला आधारगृहांकडे वरपित्यांची लागली रीघ

कोल्हापूर : लग्नासाठी मुली मिळत नसल्याने राज्यभरातील शासनाच्या महिला आधारगृहांकडे लग्नासाठी मुलगी हवी म्हणून मुलांच्या बायोडाटांची थप्पी लागत आहे. अनेक पालक या संस्थांचे उंबरठे झिजवत आहेत. परंतु हल्ली संस्थांतील विवाहयोग्य मुलींचे प्रमाण कमी झाल्याने तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.

आमच्या संस्थेतून वर्षातून एक किंवा दोन मुलींचींच लग्ने होतात; परंतु त्यासाठी रोज किमान दोन बायोडाटे येतात. आठ ते दहा पालक चौकशी करायला संस्थेत येत आहेत.
पद्मा तिवले, मानद कार्यवाह, बालकल्याण संकुल, कोल्हापूर

...तरच स्वीकारला जातो मुलाचा बायोडाटा
राज्यभरात शासन अनुदानित प्रत्येक जिल्ह्यांत दोन तरी • महिला आधारगृहे आहेत. त्यातून मुलींचे शिक्षणाने, विवाहाने पुनर्वसन करून दिले जाते. या संस्थांतील मुलींच्या विवाहाची शासनाने एक पद्धती निश्चित करून दिली आहे.

मुलाचे वय जास्तीत जास्त २८ असेल तरच त्याचा 3 बायोडाटा स्वीकारला जातो. लग्नात मुलीच्या पसंतीला महत्त्व असते. एचआयव्हीपासून सर्व आरोग्य तपासण्या कराव्या लागतात. आर्थिक स्थिती तपासली जाते.

संस्थेतील मुलींचे विवाहाने पुनर्वसन होत आहे ही • चांगलीच बाब आहे; परंतु पुरुषगृहातील मुलांचा विवाह हा विषय कुणाच्याच ध्यानीमनी अजून आलेला नाही याकडे राज्य परिविक्षा व अनुरक्षण संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी या निमित्ताने लक्ष वेधले.

Web Title: Marriage issue Women's support houses have become a source of trouble for groom fathers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.