शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

मराठी राजभाषा दिन विशेष : विद्यार्थ्यांच्या भेटीतून ‘मायमराठी’चा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 16:13 IST

नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक म्हणून इंग्रजी, तर अधिकची पात्रता म्हणून विदेशी भाषा शिकण्याकडील कल सध्या वाढत आहे. अशा परिस्थितीत मराठी भाषेबाबतची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये कायम राहावी, यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे ‘विद्यार्थी विभागाच्या भेटीला’ उपक्रम राबविला जात आहे. त्यातून ‘मायमराठी’चा जागर करण्यात येत आहे.

ठळक मुद्देमराठी राजभाषा दिन विशेष : विद्यार्थ्यांच्या भेटीतून ‘मायमराठी’चा जागरशिवाजी विद्यापीठातील उपक्रम

संतोष मिठारीकोल्हापूर : नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक म्हणून इंग्रजी, तर अधिकची पात्रता म्हणून विदेशी भाषा शिकण्याकडील कल सध्या वाढत आहे. अशा परिस्थितीत मराठी भाषेबाबतची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये कायम राहावी, यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे ‘विद्यार्थी विभागाच्या भेटीला’ उपक्रम राबविला जात आहे. त्यातून ‘मायमराठी’चा जागर करण्यात येत आहे.विद्यापीठ संलग्नित कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील २९१ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येतो. मराठी विभागात दर महिन्याला असणाऱ्या चर्चासत्र, व्याख्याने, परिसंवाद, आदी कार्यक्रमांवेळी दोन ते तीन महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना निमंत्रित केले जाते. त्यांना मराठी भाषेचा इतिहास, तिचे महत्त्व, त्यातील साहित्य, विभागातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम, अभ्यासक्रम, मराठी भाषा क्षेत्रातील रोजगार आणि उच्च शिक्षणाच्या संधींची माहिती दिली जाते.

मराठी भाषेच्या प्रसारातील त्यांच्या नवकल्पना, संकल्पना जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यात येतो. वि. स. खांडेकर स्मृतिसंग्रहालय, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र (ग्रंथालय) त्यांना दाखविण्यात येते. दि. १ ते १५ जानेवारीदरम्यान साजरा केला जाणाऱ्या मराठी भाषा संवर्धन पंधरावडा उपक्रमाअंतर्गत बोलीभाषा संकलन, प्रमाण मराठी लेखन, नवोदित लेखक मार्गदर्शन, कथा व कविता लेखन कार्यशाळा, विद्यार्थी लेखक संवाद, कविसंमेलन, युनिकोड आणि विकिपीडिया कार्यशाळा घेतली जाते.

दरवर्षी २०० विद्यार्थ्यांना संगणकावर मराठीचा वापर करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. गेल्या तीन वर्षांमध्ये या उपक्रमांमध्ये सहा हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ‘मायमराठी’चा जागर करण्याचा मराठी विभागाचा हा उपक्रम आदर्शवत ठरणारा आहे.

उपक्रमाची व्याप्ती वाढविणारमराठी विभाग हा भाषा, साहित्यसंबंधी विविध उपक्रम राबवीत आहे. मुख्यत: मराठी भाषा संवर्धनासाठी विद्यार्थी आणि समाजकेंद्री उपक्रमांचे नियमितपणे आयोजित केले जातात. ‘विद्यार्थी विभागाच्या भेटीला’ उपक्रमातून मराठी भाषेचा प्रसार, प्रचार केला जात आहे. शाळा, समाजाच्या पातळीवर या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी बुधवारी सांगितले.

गेल्या काही दशकांमध्ये बृहन्महाराष्ट्रातील मराठीची वाटचाल खुंटते आहे. महाराष्ट्राबाहेर तिचा कोंडमारा सुरू आहे. ते थांबविण्यासाठी शासनाने कृतिशील कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. मराठी अनेक बोलींना सामावून घेणारी भाषा आहे. त्यामुळे तिच्या बोलींचाही शास्त्रशुद्ध अभ्यास व्हावा.- डॉ. नंदकुमार मोरे

 

मराठी विभाग दृष्टिक्षेपात

  • विभागाची स्थापना : १९७९
  •  पदव्युत्तर अभ्यासक्रमांची संख्या : १९
  •  आतापर्यंतच्या पीएच.डी.धारकांची संख्या : २००
  • एम. फिल.धारकांची संख्या : १७५
  • मराठी विकिपीडियावर विभागाने अद्ययावत केलेल्या नोंदी : १००
  • विभागाअंतर्गत कार्यरत अध्यासने : संत तुकाराम, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, अण्णा भाऊ साठे अध्यासन

 

 

टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिनkolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ