मराठ्यांची बँकेत पत वाढली : मुळीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:22 IST2021-04-05T04:22:08+5:302021-04-05T04:22:08+5:30
कोपार्डे, ता. करवीर येथे झालेल्या करवीर तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत वसंतराव मुळीक बोलत होते. यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील उपस्थित ...

मराठ्यांची बँकेत पत वाढली : मुळीक
कोपार्डे, ता. करवीर येथे झालेल्या करवीर तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत वसंतराव मुळीक बोलत होते. यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील उपस्थित होते. मुळीक म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष भेटीगाठी, सभा, मेळावे व बैठकांना मर्यादा आल्या आहेत. अशावेळी संघटनात्मक कामांसाठी संवादाचा अभाव जाणवत आहे. तसेच समाजाचे प्रश्न व्यासपीठांवरून मांडण्यासाठी देखील अडचणी येत आहेत. यासाठी उपाय म्हणून सोशल मीडियावर ग्रुप बनवणे, ऑनलाईन मिटिंग घेणे, ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करणे असा कार्यक्रम हाती घेऊन सामाजिक प्रश्नांसाठी व्यासपीठ खुले केले जाणार आहे. याद्वारे मराठा आरक्षण सद्यस्थिती समाजापर्यंत पोहोचणे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ व सारथी संस्थेविषयीची माहिती गरजूंपर्यंत प्रसारित करणे, असा उपक्रम राबविला जाईल.
सभेला करवीर तालुका अध्यक्ष राजेंद्र खेराडे, जिल्हा युवक अध्यक्ष अवधूत पाटील, युवकाध्यक्ष इंद्रजित माने, सरदार पाटील, सतेज पाटील, कुंडलिक पाटील, मिलिंद चव्हाण, रामचंद्र पोवार, डॉ. इंद्रजित पाटील, जोतिराम पाटील, दीपक पाटील, लखन भोगम व करवीरमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ जगदाळे यांनी केले, तर आभार सरदार पाटील यांनी मानले.