Maratha Reservation : संभाजीराजेंना भेटून चंद्रकांत पाटील यांनी दिले पाठिंब्याचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 05:39 PM2021-06-16T17:39:19+5:302021-06-16T17:41:10+5:30

Maratha Reservation : गेले पाच दिवस एकमेकांवर टोलेबाजी करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मुक आंदोलनाच्या निमित्ताने बुधवारी सकाळी समोरासमोर आले.

Maratha Reservation: Letter of support given by Chandrakant Patil after meeting Sambhaji Raje | Maratha Reservation : संभाजीराजेंना भेटून चंद्रकांत पाटील यांनी दिले पाठिंब्याचे पत्र

Maratha Reservation : संभाजीराजेंना भेटून चंद्रकांत पाटील यांनी दिले पाठिंब्याचे पत्र

Next
ठळक मुद्देसंभाजीराजेंना भेटून चंद्रकांत पाटील यांनी दिले पाठिंब्याचे पत्र मी पुण्यात माझी भूमिका मांडेन  : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर  : गेले पाच दिवस एकमेकांवर टोलेबाजी करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मुक आंदोलनाच्या निमित्ताने बुधवारी सकाळी समोरासमोर आले.

शाहू महाराजांच्या समाधीस्थळी आल्याआल्या पाटील यांनी संभाजीराजे यांना आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे पत्र दिले. यावेळी पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत जी भूमिका मांडायची आहे ती मी पुण्याचा लोकप्रतिनिधी असल्याने पुण्यात मांडणार आहे.

या ठिकाणी मी मराठा समाजातील एक नागरिक म्हणून आलो आहे. यानंतर संभाजीराजे म्हणाले, चंद्रकांत पाटील हे पुण्याचे लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांना तेथील आंदोलनावेळी निमंत्रित केले जाईल. आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत आहे. या दोघांच्या भेटीकडे उपस्थित सर्वाचे लक्ष लागून राहिले होते.

Web Title: Maratha Reservation: Letter of support given by Chandrakant Patil after meeting Sambhaji Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app