शहरं
Join us  
Trending Stories
1
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
4
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
5
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
6
…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत
7
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
9
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
10
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
11
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
12
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
13
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
14
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
15
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
16
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
17
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
18
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
19
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
20
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : कोल्हापूर गुरुवारी बंद, मराठा आरक्षणासाठी आंदोलन; सकल मराठा समाजातर्फे शांततेचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 17:40 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी आॅगस्ट क्रांतीदिनी कोल्हापूर बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. हा बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर गुरुवारी बंद, मराठा आरक्षणासाठी आंदोलन सकल मराठा समाजातर्फे शांततेचे आवाहन

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी आॅगस्ट क्रांतीदिनी कोल्हापूर बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. हा बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे करण्यात आले आहे.मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यभरात ५८ मूकमोर्चे काढून निवेदन दिले होते; परंतु त्यांनी समाजाला कोणत्याही प्रकारे न्याय दिलेला नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घेतली जाणार नाही, अशा ठाम निर्धाराने सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाने दि. २४ जुलैपासून कोल्हापुरातील दसरा चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले.

विविध तरूण मंडळे, संस्था, संघटना, समाज आणि शहर आणि ग्रामीण मराठा समाजाचा दिवसागणिक या आंदोलनाला पाठबळ वाढत आहे. या आंदोलनाच्या सतराव्या दिवशी आज, गुरूवारी कोल्हापूर बंद पुकारण्यात आला आहे. सकल मराठा समाजातर्फे सकाळी अकरा वाजता दसरा चौकात जाहीर सभा होणार आहे. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती असणार आहेत.

सभा सुरू होण्यापूर्वी आॅगस्ट क्रांती दिनानिमित्त ध्वजारोहण केले जाईल. त्यानंतर राष्ट्रगीत, शाहू गौरवगीत, महाराष्ट्र गीत, मराठा आरक्षण गीत होईल. या सभेमध्ये जिल्ह्यासह राज्यातील मान्यवर वक्ते उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी पाचपर्यंत सभा सुरू राहणार आहे.

या सभेसाठी शहरासह आसपासच्या गावांतील मराठा बांधवांनी कुटुंबीयांसह उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या बंदमध्ये सहभागी होवून सभेला उपस्थित राहण्याबाबतचे आवाहन करणारे संदेश बुधवारी दिवसभर व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक आदी सोशल मिडियावर फिरत होते.एसटी, केएमटीची सुविधा बंदया बंदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील एस. टी आणि शहरातील केएमटीची सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी मुक्कामी राहणाऱ्या एसटी या बुधवारी रात्री डेपोमध्ये परत येणार आहेत.गुरूवारी सकाळपासून एकही एसटी स्थानकातून बाहेर पडणार नाही. शहरातील सर्व चित्रपटगृहे देखील बंद राहणार आहेत. प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये ही बंद राहतील. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर