शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जत पूर्वच्या ४२ गावांना पाण्यासाठी ३२ कोटी

By admin | Updated: July 9, 2015 01:00 IST

मुंबईतील बैठकीत आश्वासन : ‘म्हैसाळ’च्या पाण्याने तलाव भरणार

आंदोलन मागे : जगतापसांगली : जत तालुक्यातील पूर्व भागातील ४२ गावांना तलावाद्वारे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी देण्यासाठी राज्य शासनाने ३२ कोटींचा निधी देण्याचे निश्चित केले आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी मुंबईतील बैठकीत पाणी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना आश्वासन दिल्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे, अशी माहिती जतचे आमदार विलासराव जगताप यांनी दिली.म्हैसाळ योजनेमध्ये समावेश करण्यासाठी जत तालुक्यातील ४२ गावांतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार (दि. ६) पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी बैठक झाली. या बैठकीस खासदार संजय पाटील, आ. जगताप, आमदार सुधीर गाडगीळ, जलसंपदा विभागाचे उपसचिव उपासे, ‘कृष्णा खोरे’चे कार्यकारी संचालक गोटे, मुख्य सचिव शहा, पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार, संजय तेली, रामण्णा जिवाणावर, आदी उपस्थित होते.४२ गावांतील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. पिके वाळू लागली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. पाणीप्रश्नावर येथील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. यामुळे या गावांचा म्हैसाळ योजनेत समावेश करावा, अशी मागणी खासदार पाटील व जगताप यांनी केली. यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, तातडीने गावांचा म्हैसाळ योजनेत समावेश करता येणार नाही; पण जत पूर्व भागातील ४२ गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी संख, दोड्डनालासह जत तालुक्यातील २२ पाझर तलाव, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे म्हैसाळ योजनेच्या पाण्याने भरून दिले जातील. या पाण्याचा जत पूर्व भागातील ४२ गावांना लाभ देण्यात येईल. येथील कामे पूर्ण करण्यासाठी शासनाकडून २०१५-१६ या वर्षामध्ये ३२ कोटींचा निधी देण्यात येईल. या निधीतून अधिकाऱ्यांनी मुख्य कालव्यांची कामे शंभर टक्के पूर्ण करावीत, अशी सूचनाही अधिकाऱ्यांना दिली आहे. या निधीशिवाय, चार जेसीबी यंत्रे (डिझेलसह) शासन देणार आहे. या जेसीबींच्या माध्यमातून जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्यातील कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील. तसेच म्हैसाळ योजनेतून जत तालुक्यासाठी ४.७९ टीएमसी पाणी देण्याचे निश्चित केले आहे. (प्रतिनिधी)अंकले, खलाटीच्या पंप हाऊसचे काम नोव्हेंबरमध्येजत तालुक्यातील अंकले आणि खलाटी येथे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पंप हाऊस तयार करून पूर्व भागातील गावांना पाणी देण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण पंप हाऊसच्या कामांना बुधवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. येथील काम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आश्वासन गिरीश महाजन यांनी दिल्याचे जगताप यांनी सांगितले.