शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

माणदेशाचा मानबिंदू महिमानगड !

By admin | Updated: December 23, 2014 23:52 IST

चारही बाजूंचे तट ढासळले : इतिहासाचा अनमोल ठेवा काळाच्या पडद्याआड जाण्याची भीती

विशाल सूर्यवंशी -बुध (ता.खटाव) -माण नदीच्या काठावर वसलेल्या माणदेशाचा मानबिंदू म्हणजे महिमानगड. आदिलशाहीपासून रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी आपल्या देखरेखीखाली हा छोटेखानी किल्ला बांधला. मात्र, माणदेशाचा हा रांगडा महिमानगड सध्या अखेरच्या घटका मोजत असून, चारही बाजूंचे तट ढासळले गेले आहेत. शिवरायांच्या या साक्षीदाराला नवसंजीवनी मिळणे अत्यंत गरजेचे आहे.आपल्या आगळ्या संस्कृतीची साऱ्या जगाला नोंद घ्यायला लावणाऱ्या माणदेशातील रामोशी अन् धनगर समाज स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावण्यात नेहमीच अगे्रसर होता. म्हणूनच, छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी गडाची निर्मिती केली. ‘महिमान’ म्हणजे पाहुणा. या गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची ३,२९१ फूट आहे. पुसेगावपासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गडाला चालत जाणे सोपे आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत गडाची तटबंदी ढासळत गेली आहे. या गडावर दोन बुरुज आहेत. तसेच मारुतीचे बिन छपराचे मंदिरही होते. गावकऱ्यांनी श्रमदानातून या मंदिरावर छप्पर टाकले आहे. पूर्वी या गडावर लोकवस्ती होती. आजही गडावर जुन्या वाड्यांचे अवशेष पाहायाला मिळतात. स्वराज्याच्या सीमेवर असलल्या या गडाला शिवरायांनी बांधून घेतल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. गडाचा एक भाग वेगळा दिसत असून, तो हत्तीच्या सोंडासारखा भासतो. पूर्वी वळणा-वळणाची तटबंदी लांबूनच दुर्गपे्रमींना खुणावत असे. मात्र, अलीकडच्या काळात मोठी पडझड झाल्याने ते ही भाग्य माणवासीयांच्या नशिबी नाही. या गडावर सध्या राहण्याची सोय नाही. महिमानगडाच्या पायथ्याला असलेल्या गावाचाच आसरा घ्यावा लागतो.या गडाच्या परिसरातील रामोशी व धनगर समाज स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावण्यास अगे्रसर होता. काटक व चपळ असलेला रांगडा माणदेशी गडी दहा-दहा जणांना भारी पडायचा. शेवटपर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ राहणारा रामोशी व धनगर समाज आजही या गड परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत. माणदेशी संस्कृतीचे संग्रहालय हवेमाणचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी या गडाचे संवर्धन झाले पाहिजे. गडावरील पाण्याच्या टाक्या जिवंत करून पुन्हा त्या पिण्यास योग्य केल्या पाहिजेत. याशिवाय माणदेशाची संस्कृती सांगणारे छोटेखानी संग्रहालय या ठिकाणी उभे राहिल्यास या गडाला चांगले दिवस येतील. अनेक लहान-सहान लढाया या गडाच्या आवारात झाल्याचे इतिहास संशोधक सांगतात; पण हा इतिहास सांगणारे पुरावे शाबूत राहिले पाहिजेत. कारण, किल्ले महिमानगड तसा दुर्लक्षितच राहिला आहे.या गडाची चारही बाजूंची तटबंदी पुन्हा उभी राहिली पाहिजे. या शिवाय माणदेशाची संस्कृती सांगणारे कला दालन कण्हेरी मठाच्या धर्तीवर उभे राहिल्यास स्थानिकांना मोठा रोजगार निर्माण होईल.- गोरख मदणे, सरपंच, किल्ले महिमानगड