शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आंबा आरोग्य उपकेंद्राचा बनवला ‘ओपन बार’

By admin | Updated: September 7, 2015 00:49 IST

विदारक चित्र : सलाईनच्या खोक्यात दारुच्या बाटल्या; एका खोलीत दगडाची चूलही

आंबा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या तीन महिन्यांपासून डॉक्टर, आरोग्यसेविका नसल्याने बेवारस झालेल्या दवाखान्याला ‘बार’चे स्वरूप आल्याचे चित्र सरपंच प्रेरणा बेंडके यांनी शनिवारी केलेल्या पाहणीत उघड झाले. उघड्या दवाखान्यातील सलाईनच्या रिकाम्या खोक्यात काहींनी दारुच्या बाटल्या भरल्या असून शेजारच्या खोलीत तीन दगडांची चूल मांडली आहे. येथील दोन वैद्यकीय अधिकारी व दोन आरोग्यसेविकांची पदे रिक्त आहेत. जून महिन्यात ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने तालुका अधिकारी व पदाधिकाऱ्यांना भेटून डॉक्टरांची मागणी केली होती. मात्र, आजही पदे रिक्त असल्याने रुग्णांनी दवाखान्याकडे पाठ फिरवली आहे. रुग्णांना किरकोळ उपचारासाठी मलकापूरला जावे लागते. आरोग्य केंद्राची ही दयनीय अवस्था एका जागरुक तरुणाने व्हॉट्सअपवर टाकली आणि गावात दारूच्या बाटल्यांची चर्चा रंगली. व्हॉट्स अपवरचे हे फोटो पाहून सरपंच बेंडके यांनी सदस्य अनिल गवरे व मोनेरा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना घेऊन दवाखाना गाठला. त्यावेळी दवाखाना कर्मचाऱ्याविना सताड उघडा दिसला. सरपंचांच्या साक्षीने पुन्हा दारूच्या बाटल्यांचे चित्रीकरण झाले. बाहेरून सुसज्ज दिसणाऱ्या दवाखान्याला वालीच न उरल्याने हा दारूचा अड्डा बनतोय की काय, अशी भीती बेंडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. केंद्रातील एका रूममध्ये चूल थाटली आहे. शेजारच्या खोलीत सलाईनच्या बॉक्समध्ये चक्क देशी दारूच्या मोकळ्या बाटल्यांचा ढीग आहे. डॉक्टर नाही म्हणून रुग्ण नाही आणि आता येथे कोण फिरकत नाही म्हणून मद्यपींनी अड्डा जमवला आहे. जिल्हा प्रशासनाने येथील रिक्त पदे भरून येथील गैरकृत्याची चौकशी करावी, अशी मागणी बेंडके यांनी केली. आरोग्य अधिकारी पी. टी. ढेकळे यांच्याशी संपर्क साधला असता तालुक्यात आठ दवाखान्यांतील चार डॉक्टरांची पदे रिक्त असल्याचे सांगितले. पुढील महिन्यात पदे भरण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.अन्यथा केंद्राला टाळेपंधरा आॅगस्टच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी डॉक्टरांची मागणी केली. त्यानुसार डॉक्टराची लेखी मागणी ग्रामपंचायतीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना केली आहे. मात्र प्रशासन ढिम्म असल्याची खंत बेंडके यांनी मांडली. येथील रिक्त पदे भरून दवाखान्याचे बनलेले अड्ड्याचे रूप बदलले नाही तर दवाखान्याला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य अनिल गवरे, बासुजी गद्रे यांनी दिला आहे.