शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मंगेश चव्हाण ठरले ‘दुबई आयर्न मॅन’, महाराष्ट्रातील पहिलेच पोलीस उपअधीक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 12:54 IST

मंगेश चव्हाण यांनी या स्पर्धेत मिळविलेल्या यशामुळे कोल्हापूरच्या पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. लोकमत महामॅरेथॉनमध्ये मी धावणार, तुम्हीही धावा...

कोल्हापूर : कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश शांताराम चव्हाण हे महाराष्ट्रातील पहिले पोलीस उपअधीक्षक म्हणून ‘आयर्न मॅन’ ठरले आहेत. दुबईमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ११२.९ कि.मी.च्या या स्पर्धेत १०० देशातील सुमारे २,५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

मंगेश चव्हाण यांनी या स्पर्धेत मिळविलेल्या यशामुळे कोल्हापूरच्या पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. चव्हाण हे मूळचे सातारा येथील रहिवासी असून, सध्या ते कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

दुबई आयर्न मॅन २०२२’ ही स्पर्धा नुकतीच दुबई येथे पार पडली. एकूण ११२.९ किमीचे अंतर चव्हाण यांनी अवघ्या साडेसहा तासात पूर्ण केले. यामध्ये १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २१ किमी धावणे अशा प्रकारात हे अंतर साडेआठ तासात पूर्ण करायचे होते. सुमारे ३६ डिग्री तापमान सहन करीत हे अंतर त्यांनी कमी वेळेत पूर्ण करून कोल्हापूरचे नाव उंचावले.

कोल्हापुरात तलाव व रस्ते चांगले असल्यामुळे ‘आयर्न मॅन’ स्पर्धेच्या सरावासाठी योग्य वातावरण असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांना कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहारे व जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे सहकार्य व प्रोत्साहन लाभले.

लोकमत महामॅरेथॉनमध्ये मी धावणार, तुम्हीही धावा...

लोकमत महामॅरेथॉन स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात मानाची समजली जाते. धावणेच्या माध्यमातून शारिरीक व्यायाम होतो, हीच संधी लोकमतने महामॅरेथॉनच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध करून दिली आहे. आरोग्य चांगले व तंदुरुस्त ठेवण्यासाठी रविवारच्या लोकमत महामॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे. मी महामॅरेथॉमनध्ये धावणार आहे, तुम्हीही धावा... - मंगेश चव्हाण, ‘दुबई आयर्न मॅन’ (शहर पोलीस उपअधीक्षक, कोल्हापूर)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रDubaiदुबई