शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Kolhapur: थकबाकीपोटी माणगाव ग्रामपंचायतींने वीजवितरण कार्यालयाचे साहित्य केले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 2:56 PM

अभय व्हनवाडे  रुकडी-माणगाव: माणगाव ग्रामपंचायतींच्या थकबाकीपोटी  येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालयातील साहित्य ग्रामपंचायताने जप्त केले. जप्त साहित्य मध्ये कार्यालयातील ...

अभय व्हनवाडे रुकडी-माणगाव: माणगाव ग्रामपंचायतींच्या थकबाकीपोटी  येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालयातील साहित्य ग्रामपंचायताने जप्त केले. जप्त साहित्य मध्ये कार्यालयातील लोखंडी सह प्लास्टिक खुर्ची, कपाट, तिजोरी, टेबलचा समावेश आहे. कारवाईचे लेखी नोटीस देवून ही सहाय्यक अभियंता कदम हे वेळेत हजर न झाल्याने कारवाईस विलंब झाला.माणगाव येथील म.रा‌.वि.वि कार्यालयाकडून स्थानिक करापोटी 16 लाख रू येणे आहे. सदरचे कर भरणे बाबत २०१५ पासून ग्रामपंचायत पाठपुरावा करत आहे. पंरतू विद्युत वितरण कार्यालय‌ सदरचे कर भरणे ऐवजी स्थानिक दिवाबत्तीचे थकबाकी ग्रामपंचायतने भरावे याकरिता तगादा लावला. विद्युत वितरण कंपनी ग्रामपंचायतचे स्थानिक कर भरणे बाबत असमर्थता दर्शविताच. ग्रामपंचायत विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात न्यायालयीन दावा दाखल केला होता. यामध्ये न्यायालयाने ग्रामपंचायतीस थकीत कर वसूल करण्याचा अधिकार असल्याचे निरीक्षण नोंदवले होते.न्यायालयीन दिलेले आदेश व ग्रामपंचायतीस असलेला अधिकारतंर्गत वसूलीची कारवाई करण्यात आली. वसूली पथकामध्ये सरपंच राजू मगदूम, उपसरपंच विद्या जोग, पोलीस पाटील करसिध्द जोग, तलाठी सोमनाथ शिंदे, माजी उपसरपंच अख्तर भालदार, सदस्य अभिजित घोरपडे, प्रकाश पाटील, संजय उपाध्ये, अविनाश माने, लिपिक मायाप्पा रुपणे, प्रशांत तांदळे‌ सह ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, सदस्य उपस्थित होते.

कारवाईबाबत महवितरण कंपनी ,जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयास कळविणेत आले होते. महावितरण कंपनीने थकवलेला जवळपास 16 लाख रुपये कर जर भरला नाही तर जप्त केलेल्या वस्तूंचा जाहीर लिलाव करून उर्वरित मालमतेवर ग्रामपंचायतीचा बोजा नोंद करून सदरची थकबाकी ही महाराष्ट्र जमीन महसूलच्या नियमानुसार थकबाकी वसूल करण्यात येणार आहे. - राजू मगदूम, सरपंच , ग्रामपंचायत माणगाव  

स्थानिक कर भरणे बाबतचा अधिकार  मुख्य कार्यालयाच्या अखत्यारीतील आहे‌. याबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात आली आहे. - उमेश कदम, सहाय्यक अभियंता,म.रा.वि.वि .कंपनी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतmahavitaranमहावितरण