दसरा चौकातून कल्याण मटका घेणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:23 IST2021-01-22T04:23:08+5:302021-01-22T04:23:08+5:30
कोल्हापूर : दसरा चौकातील मैदानातून गुरुवारी कल्याण मटका घेणाऱ्यास लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. विनोद कांबळे असे अटक केलेल्या संशयिताचे ...

दसरा चौकातून कल्याण मटका घेणाऱ्यास अटक
कोल्हापूर : दसरा चौकातील मैदानातून गुरुवारी कल्याण मटका घेणाऱ्यास लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. विनोद कांबळे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख दोन हजार व मोबाईल असे आठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अवैध व्यवसायांविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात अवैध व्यावसायिकांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी दसरा चौकातील मैदानात एक युवक कल्याण मटका घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहायक फौजदार प्रदीप शेंगाळ, मुनाफ मुल्ला, मुन्ना कुडची यांनी कारवाई करून कांबळे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख २ हजार३६० रुपये व पाच हजार किमतीचा मोबाईल आणि कल्याण मटक्याचे साहित्य जप्त केले.