शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात चोऱ्या करुन कोल्हापुरात फिरणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:54 IST

कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करुन बेपत्ता असलेल्या चोरट्याला कोल्हापुरात शाहू मील परिसरात अटक ...

कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करुन बेपत्ता असलेल्या चोरट्याला कोल्हापुरात शाहू मील परिसरात अटक करण्यात आली. गणेश नारायण आदमिले (वय ३४, रा. मेथे डिअर चर्चचे मागे, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून मोपेड, दोन एलईडी संच, दोन मोबाईल संच असा सुमारे ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथके कोल्हापूर शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांनी राजारामपुरीतील शाहू मील परिसरात एका मोपेडस्वाराला संशयास्पदरित्या ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने आपले नाव गणेश नारायण आदमिले असल्याचे सांगितले. तसेच त्याच्या ताब्यातील मोपेड, दोन एलईडी संच, दोन मोबाईल संच असा सुमारे ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. हा मु्द्देमाल त्याने पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक करुन तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, अटक केलेल्या गणेश आदमिले याच्यावर कोल्हापूरसह सोलापूर, पुणे, मुंबई या जिल्ह्यांत चोरीचे सुमारे १५हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.

फोटो नं. ०१०९२०२१-कोल-गणेश आदमिले (आरोपी)

010921\01kol_35_01092021_5.jpg

फोटो नं. ०१०९२०२१-कोल-गणेश आदमिले (आरोपी)