शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

जातपंचायत विरोधात कायदा करा

By admin | Updated: January 23, 2015 00:44 IST

अंनिसची मागणी : अविनाश पाटील यांची माहिती

कणकवली : महाराष्ट्रात जात पंचायतीच्या दहशतीच्या अनेक घटना समोर येत आहेत. न्यायपालिकेला समांतर अशी व्यवस्था जात पंचायतीमुळे निर्माण झाली आहे. त्यांच्या अमानुष न्यायनिवाड्यामुळे तसेच शिक्षेच्या फतव्यांमुळे पीडित कुटुंबातील व्यक्तींना जीवास मुकावे लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने जात पंचायतीच्या मनमानी कारवाईविरोधी कायदा बनवावा, अशी आमची मागणी आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी महाड येथे ८ फेब्रुवारी रोजी जात पंचायतीच्या मनमानीविरोधी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली.येथील बौद्धविहाराच्या सभागृहात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जात पंचायत मूठमाती अभियानाचे संयोजक कृष्णा चांदगुडे, सुदीप कांबळे, अर्पिता मुंबरकर, संदेश कदम आदी उपस्थित होते.अविनाश पाटील म्हणाले, महाराष्ट्रात जात पंचायत किंवा सामाजिक बहिष्कृतताविरोधी कोणताही कायदा अस्तित्वात नाही. १९४९ सालचा वाळीत टाकण्यापासून प्रतिबंध करणारा कायदा १९६३ मध्ये रद्द करण्यात आला. १९८५ च्या सामाजिक असमानता प्रतिबंधक विधेयकाचे अजूनही कायद्यात रुपांतर झालेले नाही. गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जात पंचायतीला मूठमाती अभियान सुरु केले आहे. त्यामुळे जातीतून बहिष्कृत केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. याची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. जात पंचायत ही भारतीय संविधानाला समांतर न्यायव्यवस्था असल्याने ती तत्काळ बंद करण्यासाठी न्यायालयाने शासनाला सुनावले आहे. जात पंचायतविरोधी कायदा बनविण्याचे प्रतिज्ञापत्र शासनाच्यावतीने सप्टेंबर २०१३ मध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर आलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील मतांच्या गणितामुळे कायदा रखडला आहे. जात पंचायतीने बहिष्कृत झालेल्या व्यक्तीची तक्रार पोलिसांनी भारतीय दंडविधान संहितेच्या काही कलमांचा आधार घेऊन दाखल करून घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यासाठी यातील एका कलमानुसार गृह व न्याय विभागाची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे प्रक्रियेला बराचवेळ लागून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यास विलंब होत आहे. याचा फायदा आरोपींना मिळत असून ते मोकाट फिरत आहेत.महाराष्ट्र अंनिसने २०१३ साली नाशिक, लातूर व जळगाव येथे जात पंचायतीला मूठमाती परिषद आयोजित केली होती. याच धर्तीवर महाड येथे ८ फेब्रुवारीला परिषद होणार आहे. प्रबोधनाच्या मार्गाने अनेक कुटुंबांना सन्मानाने समाजात स्थान मिळाले आहे. तर अंनिसच्या मदतीने अनेक प्रकरणात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. नाशिक येथील भटके जोशी, मुंबईतील वैदू, अहमदनगर येथील पद्मशाली, चंद्रपूर येथील आदिवासी ेगोंड, सांगली येथील डोंबारी-कोल्हाटी जात पंचायत बरखास्त करण्यात आले आहे.ठोस कायदा नसताना केवळ प्रबोधनाच्या मार्गाने आम्ही पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. मात्र, आमच्या क्षमता व मर्यादा यांचा विचार करता हे काम अधिक प्रभावी होण्यासाठी सक्षम कायद्याची गरज आहे. त्यामुळे शासनाने लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी जात पंचायतविरोधी कायदा बनवावा अशी अंनिसची मागणी आहे. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री व सामाजिक न्यायमंत्री यांच्याबरोबर बैठकीचे आयोजन करून संबंधित घटकांशी चर्चा घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)तक्रारीविषयी संपर्क साधामहाड येथे होणाऱ्या परिषदेला सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. तसेच जात पंचायतीच्या बहिष्कृततेविरोधी कुठलीही तक्रार असल्यास कृष्णा चांदगुडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही अविनाश पाटील यांनी यावेळी केले.