शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Makar Sankranti 2018 : जाणून घ्या, संक्रांतीची बाजारपेठ, कशी होते वाण खरेदी, कसे आहेत हलव्याचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 3:07 PM

नववर्षातील पहिला सण असलेल्या मकरसंक्रांतीनिमित्त पांढरे शुभ्र तिळगूळ, हिरवट-काळी बाजरी, गुलाबी गाजर, काळेभोर तीळ, वाणाच्या वस्तू अशा साहित्याने संक्रांतीची बाजारपेठ सजली आहे. भोगी व संक्रांत यामुळे शुक्रवारी बाजारपेठेत खरेदीसाठीची गर्दी रात्री उशिरापर्यंत होती.  शनिवारी भोगी असल्याने भाज्यांची मोठी आवक झाली आहे.

ठळक मुद्देसंक्रांतीसाठी बाजारपेठ सजली, शनिवारी भोगीबाजारपेठेत खरेदीसाठीची गर्दी रात्री उशिरापर्यंत

कोल्हापूर : नववर्षातील पहिला सण असलेल्या मकरसंक्रांतीनिमित्त पांढरे शुभ्र तिळगूळ, हिरवट-काळी बाजरी, गुलाबी गाजर, काळेभोर तीळ, वाणाच्या वस्तू अशा साहित्याने संक्रांतीची बाजारपेठ सजली आहे. भोगी व संक्रांत यामुळे शुक्रवारी बाजारपेठेत खरेदीसाठीची गर्दी रात्री उशिरापर्यंत होती.  शनिवारी भोगी असल्याने भाज्यांची मोठी आवक झाली आहे.‘तिळगूळ घ्या गोड बोला, असा संदेश देणाऱ्या मकर संक्रांतीसाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत. भोगीला पांढरे तिळ लावून बाजरीची भाकरी, वरणं-वांग्यासह मिक्सभाजी, पालेभाज्यांचा गरगट्टा, राळ्याचा भात, चटण्या हे नैवेद्य दाखविले जाते.

दुसऱ्या दिवशी शेंगदाण्याची पोळी किंवा पुरणाची पोळी केली जाते. सुवाासिनी हंगामात येणारे धान्य, भाज्या, उसाचे तुकडे, गूळ, तीळ, बिबे एका मातीच्या सुगडीत घालून पूजा करतात. सुवासिनींना हळद-कुंकवासह वाणही दिले जाते. त्यामुळे लोटकी खरेदी करण्यासाठी शाहूपुरी, कुंभारवाडा येथे महिलांनी मोठी गर्दी केली आहे.

ही लोटकी दहा रुपयांपासून पुढे आहेत. तसेच तिळगुळाच्या हलव्याचे ढीगच्या ढीग तिळगूळ वड्या, लहान-मोठे तिळगूळ, रेवडी, तिळाचे लाडू विक्रीस ठेवण्यात आले आहेत.

वाण खरेदीसंक्रांतीला भेटवस्तू देण्याची प्रथा आपल्याकडे आहे. त्यामध्ये विशेष करून आरसा, प्लास्टिकचे डबे, छोट्या वाट्या, चमचे, कुंकवाचा करंडा, बांगड्या, टिकल्यांची पाकिटे व इतर साहित्य अशा वस्तू देऊन हळदी-कुंकू समारंभ साजरा केला जात आहे. त्यामुळे बाजारपेठेत वस्तू हातगाडीवर साहित्य विक्रीसाठी ठेवले आहेत.

काळ्या कपड्यांची क्रेझमकर संक्रांतील काळे कपडे परिधान करण्याची पद्धत आहे. त्यामुळे महाद्वार, लक्ष्मी रोड, भाऊसिंगजी रोड, लुगडी ओळ येथील दुकानांबाहेर लावलेल्या डिझायनर साड्यांबरोबरच इरकल व गढीवाल, काठापदराच्या साड्या मन आकर्षून घेत आहेत.

हलव्याचे दागिनेया सणाला नवविवाहितेला तिळगुळाचा हार, कर्णफुले, किरीट, बाजूबंद, कमरपट्टा, मंगळसूत्र असेअसे तिळगुळाचे दागिने घातले जातात. त्यात पारंपरिक तिळगुळाचा हार, कर्णफुले, किरीट, बाजूबंद, कमरपट्टा, मंगळसूत्र आदी तयार दागिनेही उपलब्ध आहेत. तसेच लहान मुलांचाही हलव्याचे दागिने घालून बोरन्हाणं हा विधी केला जातो.

 

टॅग्स :Makar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८kolhapurकोल्हापूर