शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

नवरात्रौत्सवात नवमीला व्हीआयपी दर्शन बंद- महेश जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:09 AM

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवात नवमीला (७ आॅक्टोबर) देवीचे व्हीआयपी दर्शन बंद राहील, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. दरम्यान, उत्सवाच्या तयारीसाठी श्रीपूजक, महापालिका, महावितरण, पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्थांची प्राथमिक बैठक पार पडली.

ठळक मुद्देनवरात्रौत्सवात नवमीला व्हीआयपी दर्शन बंद- महेश जाधव तयारीसाठी देवस्थानची प्राथमिक बैठक

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवात नवमीला (७ आॅक्टोबर) देवीचे व्हीआयपी दर्शन बंद राहील, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. दरम्यान, उत्सवाच्या तयारीसाठी श्रीपूजक, महापालिका, महावितरण, पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्थांची प्राथमिक बैठक पार पडली.समितीच्या त्र्यंबोली येथील कार्यालयात झालेल्या बैठकीस कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सचिव विजय पोवार, सहसचिव एस. एस. साळवी, सदस्य शिवाजी जाधव, राजू जाधव उपस्थित होते. येत्या २९ तारखेपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. यानिमित्त देवस्थान समितीच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली आहे.

नवरात्रौत्सवात नऊ दिवस सर्वांनाच रांगेतून वेळेत दर्शन मिळावे; यासाठी देवस्थान समिती प्रयत्नशील असते; पण या नऊ दिवसांत राज्यभरातून आमदार, खासदार, मंत्री असे व्हीआयपी लोक दर्शनासाठी येतात. एरवी अष्टमीच्या दिवशी व्हीआयपी दर्शन बंद ठेवले जाते; मात्र यंदा नवमीला म्हणजेच ७ आॅक्टोबरला सोमवार असल्याने व्हीआयपी दर्शन दिले जाणार नाही, असा निर्णय समितीने घेतला आहे.पुढील आठवड्यात मंदिराच्या स्वच्छतेला, तसेच मंदिराच्या शिखरांना रंगरंगोटी करण्यात येणार आहे. यंदा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे; त्यामुळे भाविकांना वेळेत देवीचे दर्शन मिळावे, यासाठी देवस्थान कर्मचारी व एनजीओ कार्य करतील.

पोलीस प्रशासन आणि देवस्थान समितीच्या सीसीटीव्ही यंत्रणेमार्फत चोख सुरक्षा ठेवली जाणार आहे. पाणी, स्वच्छतागृह, प्राथमिक आरोग्य केंद्र, पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.मणकर्णिका खुले करण्यासाठी पुरातत्वची परवानगीमंदिर परिसरातील मणकर्णिका कुंड पूर्ववत खुले करण्यासाठी पुरातत्व खात्याने देवस्थान समितीला परवानगी दिली आहे. डेक्कन इन्स्टिट्यूटचे अधिकारी व विद्यार्थ्यांकडे हे काम सोपविण्यात येणार आहे. ही जागा समितीच्या मालकीची असून, ती परत मिळावी यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे. जागा रितसर परत मिळाली, की कुंड खुले करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.दर्शन मंडपाचे काम समिती करेल ...तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी शासनाकडून निधी येऊन दोन महिने लोटले, तरी महापालिकेकडून काहीच काम झालेले नाही. त्यांना अंबाबाई मंदिराबद्दल गांभीर्यच नसल्याचे दिसून आले आहे. दर्शन मंडपासाठी पर्यायी जागा, पार्किंगची ठिकाणे ठरली आहेत, डिझाईन झाले तरी निविदा काढण्यात आलेली नाही. महापालिकेला दर्शन मंडप करणे जमणार नसेल, तर त्यांनी जागा आणि सर्वाधिकार देवस्थानला द्यावेत, आम्ही दर्शन मंडप उभारू, असेही जाधव म्हणाले.

 

टॅग्स :Navratriनवरात्रीkolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर