पुन्हा महायुतीच सत्तेवर येणार, संजय राऊतांच्या भविष्यवाणीवर हसन मुश्रीफांचा पलटवार
By समीर देशपांडे | Updated: October 13, 2023 18:55 IST2023-10-13T18:54:38+5:302023-10-13T18:55:39+5:30
रूग्णालयातील तृतीय श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया ऑक्टोबर अखेर पूर्ण होणार

पुन्हा महायुतीच सत्तेवर येणार, संजय राऊतांच्या भविष्यवाणीवर हसन मुश्रीफांचा पलटवार
कोल्हापूर : संजय राऊत बोलल्यानंतर पुढं काय बोलायचं सांगा. परंतू आमचे हे सरकार केवळ हाच कार्यकाळ पूर्ण करणार असे नव्हे, तर पुढच्या वर्षीही पुन्हा महायुतीच सत्तेत येणार असा विश्वास राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. हे सरकार तीन दिवसात कोसळेल असे संजय राऊत म्हणत आहेत. यावर प्रतिक्रिया विचारली असता ते बोलत होते.
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या ठिकाणी रूग्णालये उभारण्याचा धोरणात्मक निर्णय झाला असून या महाविद्यालयांच्या रूग्णालयातील तृतीय श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया ऑक्टोबर अखेर पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सीपीआर रूग्णालयात पहिल्यांदा खुब्याच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली त्या सर्व डॉक्टरांचे मुश्रीफ यांनी अभिनंदन केले.