शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: बिगुल वाजला.. उमेदवारांनी शड्डू ठोकला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:06 IST

जागावाटपासाठी महायुती त्रिसदस्यीय समिती नेमणार, नागपूरमध्ये झाली बैठक

तब्बल पाच वर्षे रखडलेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल सोमवारी वाजले. यामुळे इच्छुक उमेदवारांसह हवसे, नवशांची लगीनघाई सुरू झाली. प्रभागांमध्ये कार्यक्रमांचा धडाका लावत इच्छुकांनी नेत्यांसमोर उमेदवारीची दावेदारी केली आहे. विशेष म्हणजे कोणत्याच पक्षाने अद्याप एकही उमेदवार जाहीर केला नसला तरी एका एका प्रभागात एका पक्षाकडून १५-१५ उमेदवार लढण्याची भाषा करत असल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. सोमवारी निवडणुकीची घोषणा जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी सोशल मीडियावर ‘हम है तैयार’चा नारा दिला.जागावाटपासाठी महायुती त्रिसदस्यीय समिती नेमणार, नागपूरमध्ये झाली बैठककोल्हापूर : येथील महापालिकेच्या निवडणुकीच्या जागावाटपाबाबत दोनच दिवसांपूर्वी नागपूरमध्ये बैठक झाली आहे. यावेळी महायुतीमधील भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसची प्रत्येकी त्रिसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय झाला आहे.वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक उपस्थित होते. आमदार राजेश क्षीरसागर हे उदयपूरला एका विवाह समारंभासाठी गेले होते. त्यामुळे ते अनुपस्थित होते असे सांगण्यात आले. परंतु, या बैठकीतील निर्णय त्यांनाही कळविण्यात आला आहे.

वाचा - दोन्ही आघाड्यांकडून मोर्चेबांधणीला वेग, प्रशासनाचीही लगबगयावेळी महायुतीमधील तीनही पक्षांनी प्रत्येकी त्रिसदस्यीय समिती नेमावी आणि वाॅर्डनिहाय उमेदवारांची यादी तयार करावी. ज्या ठिकाणी एकमत होईल त्या ठिकाणी काही प्रश्न येणार नाही. परंतु, जिथे दुमत असेल त्या ठिकाणी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्वेक्षणामध्ये नेमके कोण पुढे असेल त्याला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.समितीमधील संभाव्य नावेभाजपकडून या समितीमध्ये आमदार अमल महाडिक, जयंत पाटील, विजय जाधव यांचा समावेश होऊ शकतो, तर शिंदेसेनेच्या समितीमध्ये आमदार राजेश क्षीरसागर, समन्वयक नाना कदम, शारंगधर देशमुख यांच्या नावांची चर्चा आहे, तर राष्ट्रवादीकडून आदिल फरास यांच्यासह आणखी दोन प्रमुख कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

वाचा : दहा वर्षांनंतर होणार निवडणूक, उमेदवारांसह नेत्यांनीही सोडला सुटकेचा नि:श्वास

इचलकरंजीत राष्ट्रवादी भाजपच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेतएकीकडे कोल्हापूरमध्ये महायुती म्हणून तीनही पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात असताना इचलकरंजीत मात्र अजूनही महायुतीचे काही ठरले की नाही हे जाहीर झालेले नाही. इचलकरंजीमध्ये भाजपचे नेतृत्व माजी आमदार प्रकाश आवाडे आणि सुरेश हाळवणकर करीत आहेत. त्यांच्याकडून आम्हांला अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद नाही असे सांगत आम्ही प्रतीक्षा करीत आहोत, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच कोणत्याही निवडणुकीला सज्ज असतो. त्यानुसार आम्ही तयारी केली आहे. इचलकरंजीतून भाजपकडून आम्हांला प्रतिसादाची अपेक्षा आहे. कोल्हापूरमध्ये महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत. - हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षणमंत्री

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Election: Campaign Begins, Candidates Prepare for Battle

Web Summary : Kolhapur Municipal Corporation election announced after five years. Political alliances form committees for seat sharing. BJP, Shinde Sena, and NCP will survey wards to decide candidates. Ichalkaranji awaits BJP's response for alliance.