शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

Kolhapur Politics: महायुती की सतेज यांची मैत्री? मुश्रीफांसाठी राजकीय कात्री; सत्ताधाऱ्यांकडून काँग्रेस टार्गेट

By भारत चव्हाण | Updated: June 9, 2025 18:13 IST

माजी नगरसेवक, तुल्यबळ इच्छुकांवर शिंदेसेनेची नजर

भारत चव्हाण कोल्हापूर : गेल्या अठरा वर्षांपासून महानगरपालिका सभागृहात सत्ता गाजविताना ‘आम्ही ठरवू तोच महापौर आणि पदाधिकारी होतील’, अशा रुबाबात वावरलेल्या काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यासमोर मागील काही निवडणुकीतील पराभूत मानसिकतेतून बाहेर पडण्याचे आव्हान आहे. शारंगधर देशमुख यांच्यासारख्या खंद्या समर्थकाने त्यांची साथ सोडल्यामुळे निवडणुकीच्या मैदानापर्यंत कार्यकर्ते, माजी नगरसेवकांना सांभाळण्यासह सत्तेपर्यंत पोहचण्यासाठी नगरसेवक निवडून आणण्याचे कडवे आव्हान असेल.आणखी एक गोष्ट अधिक महत्त्वाची अशी की, यापूर्वी आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिकेच्या राजकारणात ‘मिलीभगत’ करून सत्तेची पदे वाटून घेतली होती. एवढेच नाही, तर नगरसेवक निवडणूक आणण्याच्या बाबतीत विशिष्ट नीती अवलंबिली. त्यामुळे मोठे आव्हान असतानाही दोघांनी मिळून ४४ नगरसेवक निवडून आणले होते, परंतु आता मुश्रीफ यांच्यावरच महायुतीचा प्रचंड दबाव आहे. जे करायचे असेल ते ‘महायुती’ म्हणूनच करावे लागणार आहे. त्यामुळे मुश्रीफ-पाटील यांच्यातील मिलीभगत यावेळी तुटणार आहे.लोकसभा आणि पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला विशेषकरून काँग्रेसला धक्के देऊन जिल्ह्यातून नामशेष करण्याचे आणि त्यातही आमदार सतेज पाटील यांच्या राजकारणाला ब्रेक देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभेला पन्नास टक्के गणित जमले, विधानसभेवेळी काँग्रेसला भुईसपाट करण्यात त्यांना यश मिळाले. आता हीच रणनीती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, तसेच गोकुळच्या निवडणुकीत खेळली जाणार आहे. सतेज पाटील हेच प्रमुख टार्गेट समोर ठेऊन महायुती चाली खेळत आहे.काँग्रेसचे माजी नगरसेवक फोडण्याचे शिंदे सेनेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शारंगधर देशमुख सारख्या विश्वासू सहकाऱ्याला फोडून आमदार पाटील यांना पहिला धक्का दिला. आता अन्य काही माजी नगरसेवक तसेच काँग्रेसकडून तिकिटासाठी इच्छुक असणाऱ्या ताकदवान उमेदवारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्नही शिंदे सेनेने सुरू केले आहेत. महिन्याभरात सगळे चित्र समोर येईल. आमदार पाटील यांना आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक सोपी राहिलेली नाही.निधी देणार कोठून ?काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या भागातील विकास कामे करण्यास निधी द्यावा लागणार आहे. खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील यांना असा निधी देण्यात प्रचंड अडचणी आहेत. या उलट भाजप, शिंदे सेना, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडे सत्तेत असल्यामुळे निधीला कमतरता नाही. त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्यांचा ओढा हा स्वाभाविकच महायुतीकडे राहिल.

महायुतीची लढत प्रामुख्याने काँग्रेसशीच असेल. उद्धव सेना व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ताकद राहिलेली नाही. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक आणि मी अशांच्या नेतृत्वाखाली महापालिकेची निवडणूक लढविणार आहोत. आमच्यात योग्य समन्वय आहे. - राजेश क्षीरसागर, आमदार  

इंडिया आघाडी व महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची बैठक झाली असून सर्वांनी एकसंघपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. ५० हून अधिक माजी नगरसेवक बैठकीस उपस्थित होते. सर्वांनी आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे कोणी कितीही फोडाफोडीचे प्रयत्न केले तरी आमच्या आघाडीवर कसलाही परिणाम होणार नाही. सत्ताधाऱ्यांनी आधी त्यांच्या युतीतील एकोपा जपण्याचा प्रयत्न करावा.  - सचिन चव्हाण, शहराध्यक्ष- काँग्रेस

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणMahayutiमहायुतीcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफElectionनिवडणूक 2024