शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Kolhapur Lok Sabha Election Result 2024: निवडणूक खर्चात संजय मंडलिक, धैर्यशील मानेच पुढे; किती केला खर्च.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 12:30 IST

Kolhapur Lok Sabha Election Result 2024 : शाहू छत्रपती, राजू शेट्टी दुसऱ्या नंबरवर

Kolhapur Lok Sabha Election Result 2024 कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा निवडणुकीसाठी केलेल्या खर्चात तिसऱ्या पडताळणीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकधैर्यशील माने हे आघाडीवर राहिले आहेत. मंडलिक यांनी प्रचारावर ४ मे पर्यंत ६९ लाख ९२ हजार ०३२ रुपये तर माने यांनी ७५ लाख २६ हजार ९३५ रुपये खर्च केले आहे. शाहू छत्रपती व राजू शेट्टी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीकडून संजय मंडलिक व महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती या प्रमुख दोन उमेदवारांसह २३ जणांनी निवडणूक लढविली. अन्य उमेदवार वेगवेगळ्या पक्षाचे व अपक्ष असून त्यांनी सादर केलेला खर्च जास्तीत जास्त एक लाखापर्यंत आहे.उमेदवारांनी प्रचारासाठी केलेल्या खर्चाच्या पडताळणीसाठी कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांसाठी स्वतंत्र निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी ३ व ४ मेपर्यंत तीनवेळा उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाची पडताळणी केली.

मंडलिक यांना ३० लाखांचा खर्च अमान्यसंजय मंडलिक यांनी आपल्या प्रचारावर झालेल्या एकूण खर्चापैकी ३० लाख ८६ हजार ०८६ रुपये इतका खर्च अमान्य केला आहे. तर शाहू छत्रपती यांनीदेखील ९ लाख १२ हजार ८०० रुपये हा खर्च अमान्य केला आहे.

अंतिम आकडा ४ जूननंतरचवरील आकडेवारी ही अंतिम पडताळणीची असली तरी ४ जूननंतर एक महिन्याने उमेदवारांना खर्च सादर करण्याची मुभा आहे. निवडणूक निरीक्षकांनी दाखवलेले काही खर्च उमेदवारांना अमान्य असतात. मतमोजणी दिवशीदेखील उमदेवारांकडून खर्च केला जातो, विजयी मिरवणूक निघते. तो खर्चदेखील निवडणूक खर्चात धरला जातो.

कोल्हापूर मतदारसंघउमेदवार : खर्च

  • संजय मंडलिक : ६९ लाख ९२ हजार ०३२ रुपये
  • शाहू छत्रपतींनी ५९ लाख ९८ हजार ९६१ रुपये

हातकणंगले मतदारसंघ

  • धैर्यशील माने - ७५ लाख २६ हजार ९३५
  • राजू शेट्टी : ४४ लाख ८६ हजार ९३६
  • सत्यजित पाटील-सरूडकर : ३५ लाख ०९ हजार ६९६
टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४sanjay mandlikसंजय मंडलिकdhairyasheel maneधैर्यशील मानेShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीRaju Shettyराजू शेट्टीSatyajit Patilसत्यजित पाटील