शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 20:19 IST

Raju Shetty : लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचा यावेळी मोठा मताधिक्क्याने पराभव झाला. दरम्यान, आता शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे.

Raju Shetty ( Marathi News ) : लोकसभा निवडणुका संपल्या. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला समोरे जावे लागले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मविआ आधी स्वाभीमानी शेतकरी संघटनेला सोडणार अशा चर्चा सुरू होत्या, पण शेवटच्या क्षणी या मतदारसंघात ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा माजी खासदार राजू शेट्टी यांना पराभवला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, आता राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 

विरोधक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत; लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देणार? आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शक्तिपीठ महामार्ग आणि लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले. राजू शेट्टी म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाची सध्या आवश्यक्ता नाही.  गोवा, नांदेड, लातूर या सगळीकडे जाण्यासाठी महामार्ग आहे. आता पुन्हा त्याच दिशेला जाण्यासाठी नव्या महामार्गाची गरज नाही. आता आहे त्याच टोल नाक्यांना अपेक्षित पैसे मिळत नाहीत, यावरुन असं लक्षात येतं काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि राजकीय नेत्यांना शक्तिपीठच्या माध्यमातून अमाप पैसा गोळा करायचा आहे, जसा समृद्धी महामार्गातून मिळवला, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला. 

'यातून अनेकांची समृद्धी केली आणि आमदार खासदारांच्या खरेदीचा भाव वधारला. आता नेमकी कशाची खरेदी करायची आहे कुणाला आर्थिक शक्ती द्यायची आहे, असा सवालही राजू शेट्टी यांनी केला. शेतकऱ्यांचा या मार्गाला विरोध आहे, बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा मार्ग होऊ द्यायचा नाही असा निर्धार केला आहे, असंही शेट्टी म्हणाले. 

राजू शेट्टींचा गंभीर आरोप 

"लोकसभा निवडणुकीवर बोलताना राजू शेट्टी म्हणाले, खरंतर पाठिंबा दिल्यानंतर नेमकं निवडणून आल्यानंतर काय भूमिका घेणार याबाबत ड्राफ्ट तयार केला होता. तो ड्राफ्ट जयंत पाटील, बंटी पाटील यांनी  तयार केला होता. पण, नंतर त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला. सहा महिन्यापासून ते आम्ही ही जागा सोडली असं सांगत होते. त्यांना वाटत होतं मी उमेदवार आहे त्यांच्या नेत्यांना भेटायला हवं. मी तसे सगळ्यांना भेटलो होतो. पण शेवटी या नेत्यांनी जे करायचं होतं तेच केलं, असा आरोपही माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४