शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : धनंजय महाडिकांना धक्का! आक्षेपार्ह विधानाबाबत निवडणूक विभागाकडून नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 16:09 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : खासदार धनंजय महाडिक यांनी काल महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचे समोर आले होते.

 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : मुंबई - लाडकी बहीण योजनेवरून राजकारण पेटले आहे. महायुतीने जाहीर केलेले दर महिन्याचे १५०० रुपये आता जाहीरनाम्यात २१०० रुपये केले आहेत. तर महाविकास आघाडीने ते ३००० रुपये केले आहेत. फुकट वाटल्या जाणाऱ्या योजनांना विरोध करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्रात येऊन या योजनेची देशात चर्चा असल्याची स्तुती केली आहे. अशातच भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे धक्कादायक वक्तव्य येत आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो, असे वक्तव्य महाडिक यांनी केले आहे. दरम्यान, आता या विधानाबाबत निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मी म्हातारा झालो नाही, सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'; शरद पवारांचा निर्धार

खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून निवडणुकीची आचार संहिता १५ ऑक्टोंबर, २०२४ पासून लागू झालेली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप फुलेवाडी ता.करवीर येथील राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता - २०२३ चे कलम १७९ अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबतचा खुलासा तात्काळ सादर करण्यात यावा अशी नोटीस त्याच दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण यांनी धनंजय महडिक यांना दिली आहे.

धनंजय महाडिकांचे धक्कादायक वक्तव्य

लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो, असे वक्तव्य महाडिक यांनी केले आहे. ''जर इथे काँग्रेसची रॅली निघाली आणि त्यामध्ये आपल्या योजनेचे १५०० रुपये घेतात त्या महिला दिसल्या त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून घ्या. घ्यायचे आपल्या शासनाचे आणि गायचे त्यांचे असे नाही चालणार'', असे दम महाडिक यांनी भरला आहे. भर सभेमध्ये महाडिक यांचे हे वक्तव्य आलेले आहे. 

अनेक ताया महाराष्ट्रात आहेत, छाती बडवत आहेत. आम्हाला नकोत पैसे, आम्हाला नकोत आम्हाला सुरक्षा पाहिजे. पैसे नकोत? राजकारण करता पैशांचे? काँग्रेसच्या सभेला महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे, काँग्रेसच्या रॅलीला महिला दिसल्या जाऊन त्यांचे फोटो काढायचे. आम्ही व्यवस्था करतो त्यांची, अशी धमकी महाडिक यांनी दिली आहे. 

जर मोठ्याने कोण भाषण करायला लागली, दारात आली तर तिला एक फॉर्म द्यायचा आणि लगेच करतो बंद म्हणायचे पैसे. आमच्याकडे काय लय पैसे झालेले नाहीत, असे वक्तव्य महाडिक यांनी केले आहे. यावरून आता राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapurकोल्हापूरDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग