शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 19:10 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : 'महाराष्ट्रातील सरकार ज्या लोकांनी पैशाच्या जोरावर चोरले ती लोक संविधानाच्या गोष्टी करतात, अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. प्रियांका गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर होत्या, त्यांनी महाविकास आघाडीची जाहीर सभा घेतली. यावेळी प्रियांका गांधी बोलत होत्या. 

भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!

जाहीर सभेत बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या, काही दिवसापूर्वी पीएम मोदींनी राहुल गांधी, पंडित नेहरु आरक्षणाच्या विरोधात असल्याची टीका केली, पण देशात नेहरुंनीच आरक्षण लागू केले आहे, तसेच राहुल गांधी यांनी देशभरात भारत जोडो यात्रा काढली, यावेळी त्यांनी जाती जनगननेची मागणी केली. तरीही तुम्ही म्हणता ते आरक्षणाविरोधात आहेत. महाराष्ट्रात जनतेने जे सरकार आणले ते सरकार तुम्ही करोडो रुपये देऊन चोरी केले आणि तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता, तुम्ही संविधान वाचवणार, असा टोलाही प्रियांका गांधी यांनी भाजपाला लगावला. तुम्ही भ्रष्टाचाराच्या गोष्टी करता, आमदार खरेदी करण्यासाठी कुठून आले एवढे करोडो रुपये, शंभर, शंभर कोटी रुपये कुठून आले. कोणाचे आहेत हे पैसे. महाराष्ट्रात तुम्ही सरकार खरेदी केले, असा आरोपही गांधी यांनी केला.  

" संविधानाने तुम्हाला सरकार बनवण्याचा अधिकार दिला आहे. तुम्ही सरकार बनवता पण मोदींनी देशारत सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा सुरू केली आहे. आणि हीच लोक आरक्षण आणि भ्रष्टाचारवर बोलत आहेत. तुम्ही डोळे उघडा, असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.  नरेंद्र मोदी यांची भाषण ऐकली  की दुःख होतं. सत्य आणि सकारात्मक भाषण ऐकायला मिळत नाही. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जात आहे. मोदी व्यासपीठावर येतात आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात आणि त्यांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीकाही प्रियांका गांधी यांनी केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीElectionनिवडणूक 2024kolhapurकोल्हापूर