शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

Maharashtra Vidhan Sabha 2019:केपी-एवाय यांच्या उमेदवारीबाबत उद्या निर्णय शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 1:24 PM

राधानगरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार? याचा फैसला उद्या, रविवारी सातारा येथे होण्याची शक्यता आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने त्या दिवशी सातारा दौऱ्यावर आहेत.

ठळक मुद्देकेपी-एवाय यांच्या उमेदवारीबाबत उद्या निर्णय शक्यसातारा येथे दोन नेत्यांसमवेत पवार यांची चर्चा होण्याची शक्यता

कोल्हापूर : राधानगरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार? याचा फैसला उद्या, रविवारी सातारा येथे होण्याची शक्यता आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने त्या दिवशी सातारा दौऱ्यावर आहेत.या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची, असा पेच राष्ट्रवादी  कॉँग्रेससमोर निर्माण झाला आहे. के. पी. पाटील व ए. वाय. पाटील या दोन्ही मातब्बर नेत्यांनी निवडणूक लढण्याची जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे दोघांनीही उमेदवारीवर दावा सांगितला आहे.

यापूर्वी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत पवार यांच्यासमोरच या दोन नेत्यांनी आमच्या दोघांपैकी कोणालाही उमेदवारी दिली तरी चालेल. तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असे स्पष्ट केले होत; परंतु त्यानंतर दोघांनीही आपल्यालाच उमेदवारी हवी, अशी मोर्चेबांधणी केली आहे.

मागच्या दोन दिवसांपूर्वी बीड येथे जाऊन ए. वाय. पाटील समर्थकांनी  पवार यांची भेट घेतली होती आणि उमेदवारीबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती केली होती. त्यावेळी पवार यांनी मी दोन दिवसानंतर पुण्यात आल्यावर या दोघांनाही एकत्र बोलावून उमेदवारीचा निर्णय घेऊ, असे सांगितले होते. त्यामुळे रविवारी पुणे किंवा सातारा येथे या दोन नेत्यांसमवेत पवार यांची चर्चा होण्याची शक्यता आहे.

उमेदवारी कोणाला मिळते आणि ज्याला मिळाली नाही तो काय भूमिका घेणार, यावरच राष्ट्रवादीचे या मतदारसंघातील आव्हान किती ताकदीचे असेल, हे ठरणार आहे. 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूर