महाराष्ट्र एक्स्प्रेस नव्या एलएचबी कोचसह धावणार, प्रवास आरामदायी होणार; तब्बल ५४ वर्षांनंतर केला बदल

By संदीप आडनाईक | Updated: May 27, 2025 19:39 IST2025-05-27T19:39:24+5:302025-05-27T19:39:43+5:30

संदीप आडनाईक कोल्हापूर : हरिप्रिया, महालक्ष्मी एक्सप्रेस पाठोपाठ वजनाला हलके, जास्त आसन क्षमता आणि स्वच्छ स्वच्छतागृहांच्या एलएचबी कोचच्या सुविधांचा ...

Maharashtra Express will run with new LHB coaches, travel will be comfortable | महाराष्ट्र एक्स्प्रेस नव्या एलएचबी कोचसह धावणार, प्रवास आरामदायी होणार; तब्बल ५४ वर्षांनंतर केला बदल

महाराष्ट्र एक्स्प्रेस नव्या एलएचबी कोचसह धावणार, प्रवास आरामदायी होणार; तब्बल ५४ वर्षांनंतर केला बदल

संदीप आडनाईक

कोल्हापूर : हरिप्रिया, महालक्ष्मी एक्सप्रेस पाठोपाठ वजनाला हलके, जास्त आसन क्षमता आणि स्वच्छ स्वच्छतागृहांच्या एलएचबी कोचच्या सुविधांचा लाभ आता महाराष्ट्र एक्सप्रेसचे प्रवासी १ जून पासून घेणार आहेत. या गाडीला १८ नवीन एलएचबी कोच लावल्याने रेल्वेला आणखी गती मिळणार आहे.

भारतीय रेल्वेने सर्व आयसीएफ कोच हटवून त्याऐवजी एलएचबी कोच वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीतील सर्वच्या सर्व जुने रॅक बदलण्यात येणार असून ते आधुनिक लिंक हाफमन बूश डब्यांमध्ये रूपांतरित केले जाणार आहेत. या बदलामुळे पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी, सुरक्षित, सुखकर आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे. 

राज्यातील सर्वाधिक लांब अंतर धावणारी ही गाडी रोज कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून (ट्रेन क्रमांक ११०३९) १८ एलएचबी कोच आणि नवीन संरचनेसह धावणार आहे तर गोंदिया-कोल्हापूर एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक ११०४०) ३ जूनपासून गोंदिया रेल्वेस्थानकावरून एलएचबी कोच आणि नवीन संरचनेसह धावणार आहे. तब्बल ५४ वर्षानंतर हा बदल होत आहे.

  • १ नोव्हेंबर १९७१ : कोल्हापूर-गोंदिया मार्गावर पहिला प्रवास
  • १२ जिल्ह्यांतून प्रवास : कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, जळगाव, अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा
  • १३४१ किलोमीटरचा मार्ग
  • २७ तास ४५ मिनिटे : प्रवासाचा वेळ
  • ११० किलोमीटर ताशी वेग
  • २.४५ वाजता : कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सवरून मार्गस्थ
  • ६ वाजता : दुसऱ्या दिवशी गोंदिया गंतव्य स्थानावर पोहोचते
  • ६२ स्थानकांवर थांबा


अशी असेल संरचना

  • १ द्वितीय वातानुकुलित कोच
  • ४ तृतीय वातानुकुलित कोच
  • ७ शयनयान कोच
  • ४ सामान्य द्वितीय श्रेणी कोच
  • १ सामान्य द्वितीय श्रेणी कोच
  • १ जनरेटर कार


हे आहेत थांबे
छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, वळिवडे, रुकडी, हातकणंगले,जयसिंगपूर, मिरज, सांगली, भिलवडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, भवानीनगर, कराड, मसूर, तारगाव, रहिमतपूर, कोरेगाव, सातारा, जरंडेश्वर, वाठार, लोणंद, निरा, जेजुरी, आंबले, घोरपडी, पुणे, उरळी, कोडगाव, दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, पुणतांबा, कोपरगाव, येवला, मनमाड, नंदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा, जलंब, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, तुळजापूर, शिंदी, अंजनी, नागपूर, इतवारी, कामठी, भंडारा रोड, तुमसर रोड, तिरोडा, गोंदिया

नव्या कोचचे वैशिष्ट्य
वजनाला हलके आणि जास्त आसन क्षमता, स्वच्छ स्वच्छतागृहे असलेले हे नवीन एलएचबी कोच लावल्याने रेल्वेला आणखी गती मिळणार आहे. या गाडीतील सर्वच्या सर्व जुने रॅक बदलण्यात येणार असून ते आधुनिक लिंक हाफमन बूश डब्यांमध्ये रूपांतरित केले जाणार आहेत. या बदलामुळे पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी, सुरक्षित, सुखकर आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे.

लिंके-हॉफमन-बुश कोचचे वैशिष्ट्य

  • लिंके-हॉफमन-बुश (एलएचबी) कोच हे भारतीय रेल्वेचे प्रवासी डबे आहेत, जे जर्मनीतील लिंके-हॉफमन-बुश या कंपनीने विकसित केले आहेत आणि भारतातील कपूरथला, चेन्नई आणि रायबरेली येथील रेल्वे कोच उत्पादन युनिट्समध्ये तयार केले जातात. 
  • हे कोच २००० पासून भारतीय रेल्वेच्या १६७६ मिमी (५ फूट ६ इंच) ब्रॉड गेज नेटवर्कवर वापरले जात आहेत. सुरुवातीला, शताब्दी एक्स्प्रेससाठी जर्मनीहून २४ वातानुकूलित कोच आयात करण्यात आले होते. त्यानंतर तंत्रज्ञान हस्तांतरणानंतर रेल कोच फॅक्टरीने देशांतर्गत उत्पादन सुरू केले.

Web Title: Maharashtra Express will run with new LHB coaches, travel will be comfortable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.