Maharashtra Election 2019: शरद पवार यांना राजकारणातून कायमची विश्रांती देणार - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 14:54 IST2019-10-08T14:53:19+5:302019-10-08T14:54:30+5:30
येत्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांना राजकारण आणि समाजकारणातून कायमची विश्रांती देणार

Maharashtra Election 2019: शरद पवार यांना राजकारणातून कायमची विश्रांती देणार - चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : येत्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांना राजकारण आणि समाजकारणातून कायमची विश्रांती देणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे जाहीर केले..
राधानगरी मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते..तुरंबे (ता.राधानगरी) येथे ही सभा झाली. मला कोथरूडमध्ये अडकून ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या दोन्ही कॉंग्रेसवाल्याना साधा उमेदवार मिळाला नाही. त्यावरून या पक्षांची ताकद कळते..मी या मतदार संघातून निवडून येणार हे सांगण्यासाठी जोतिष्याची गरज नाही असा विश्वासही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला..कोल्हापूर जिल्ह्यातील युतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा दावा त्यांनी केला..