- वसंत भोसलेकोल्हापूर : कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने गयारामांच्या पक्षांतरानंतरही महायुतीसमोर आव्हान उभे केले आहे. या दोन्ही पक्षांच्या आघाडीतील समन्वयामुळेच पश्चिम महाराष्ट्र हा आघाडीचा आधार ठरणार आहे. दरम्यान, महायुतीनेही हा गड भेदण्याच्या प्रयत्नात आयारामांना पायघड्या घातल्या आहेत आणि निष्ठावंतांना वाऱ्यावर सोडले आहे.पश्चिम महाराष्टÑातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांतील ५८ जागांसाठी ‘आघाडी विरुद्ध महायुती’ यांच्यात रस्सीखेच आहे. मागील निवडणुकीत भाजपने पुणे जिल्ह्यातील यशाच्या जोरावर २१ जागा जिंकल्या होत्या. पूर्ण जिल्ह्यात १३ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेने स्वतंत्र लढताना १३ जागा पटकावल्या. पश्चिम महाराष्टÑात पराभव होतानाही राष्टÑवादी कॉँग्रेसचे वर्चस्व राहिले होते. या पक्षाला १६, तर कॉँग्रेसला केवळ सातच जागा मिळाल्या होत्या. ‘शेकाप’ने सांगोल्याची जागा कायम राखली होती.गत निवडणुकीत चारही प्रमुख पक्ष स्वतंत्र लढत होते. यावेळी महायुती आणि आघाडी आहे. भाजप ३१ जागा, तर शिवसेना २८ जागा लढवीत आहे. सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघात युती नाही. दोन्ही पक्ष लढा देत आहेत. पुणे शहरातील आठही जागा भाजप लढवीत आहे. उर्वरित जिल्ह्यात भाजपची मदारही कॉँग्रेस-राष्टÑवादीतून आयात केलेल्या उमेदवारांवर आहे. कॉँगे्रस आणि राष्टÑवादीतून अनेक नेते बाहेर पडले असले तरी या पक्षांची ताकद कमी झालेली नाही. त्यांनी पर्यायी उमेदवार उभे केले आहेत. सातारा जिल्ह्यात राष्टÑवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस आघाडीची अधिक पडझड झाल्याने भाजपला सक्षम उमेदवार मिळाले आहेत. अन्यथा या जिल्ह्यात भाजपला मागील निवडणुकीत भोपळा फोडता आला नव्हता.कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉॅँग्रेस आघाडीने चार ठिकाणी अपक्ष, दोन ठिकाणी प्रत्येकी शेकाप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पुण्यातील कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मनसेच्या उमेदवारास पाठिंबा दिला आहे. तरीदेखील राष्टÑवादी कॉँग्रेस पक्ष पश्चिम महाराष्टÑात सर्वाधिक ३१ जागा लढवीत आहे. साताºयाचे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले, अकलूजचे विजयसिंह मोहिते-पाटील, कोल्हापूरचे धनंजय महाडिक, कॉँग्रेसचे हर्षवर्धन पाटील, आदींनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.महायुतीतर्फे भाजपने प्रचारात काश्मीरसाठीचे ३७० कलम, तलाक प्रकरण, स्वच्छ कारभार, दुष्काळी भागाला पाणी, आदींवर भर दिला आहे. महाराष्टÑाच्या सर्वांगीण विकासाचा दावाही केला आहे. आश्वासनांची खैरात करण्यात काही कसूर सोडलेली नाही. याउलट राष्टÑवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस पक्षाने ‘यांतील एकही गोष्ट झालेली नाही.’ शेतकरी कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना झालाच नाही; असा दावा करीत ‘केवळ विरोधी पक्षांमध्ये फाटाफूट करून सत्ता बळकाविण्याचा डाव खेळला आहे,’ असा आरोप केला आहे.मुख्य लढत ही भाजप विरुद्ध राष्टÑवादी काँग्रेसमध्येच- राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाची राज्यात सर्वाधिक ताकद पश्चिम महाराष्टÑातून येते. याच विभागात पडझडही खूप झाली आहे. यावर मात करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी सातत्याने दौरे करीत प्रत्येक मतदारसंघात लक्ष घातले आहे. ‘मी म्हातारा झालो नाही,’ या त्यांच्या वक्तव्यावर त्यांना मोठी सहानुभूती मिळत आहे. ज्यांना सत्ता दिली त्यांनी अनेक वर्षे सत्ता भोगून या वयात पवार यांना सोडल्याबद्दल लोकांच्या मनात राग आहे.- महायुतीत सर्व काही आलबेल आहे असे नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील जनसुराज्य पक्ष भाजपच्या छुप्या पाठिंब्यावर चार ठिकाणी शिवसेनेविरुद्ध लढतो आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना यावेळी सोबत नाही. राष्टÑीय समाज पक्ष नाराज आहे. गोपीचंद पडळकर यांना महत्त्व देत महादेव जानकर यांना डावलल्याची भावना आहे. हीच अवस्था रिपब्लिकन पक्षाची आहे. शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघात भाजप प्रामाणिकपणे मदत करणार का? असा प्रश्न सध्याचे वातावरण पाहून तरी पडतो. उमेदवारीसाठी भाजपमध्ये आलेल्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे. त्याचा फटका महायुतीला बसू शकतो.- राष्टÑवादी कॉँगे्रसच्या तुलनेत कॉँग्रेस पक्षाची तयारी काहीच नाही. त्यांचे नेते आपापल्या मतदारसंघांत आहेत. एकही मोठी सभा नाही की, प्रचारामध्ये सुसूत्रता नाही. ज्या मतदारसंघात भाजप-शिवसेनाचा बेबनाव आहे, त्याचा लाभही उठविण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे मुख्य लढत ही भाजप व राष्टÑवादीतच आहे.साताºयाची लढाई विधानसभेच्या निवडणुकांबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा सामना राष्टÑवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्याशी आहे. या जिल्ह्यात राष्टÑवादीचे नेहमीच वर्चस्व असल्याने उदयनराजे यांना ही निवडणूक जड जाणार असे स्पष्ट दिसते आहे. शिवसेनेची साथ मिळाली तर विजयापर्यंत जाता येईल. ही जागा शिवसेनेकडे होती. ती काढून घेतल्याने सेनेत नाराजी आहे.
Maharashtra Election 2019 : पश्चिम महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या का महत्त्वाचा आहे?
By वसंत भोसले | Updated: October 12, 2019 04:35 IST