शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

गद्दार आणि खोटारड्यांवर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकत नाही म्हणून ही रडारड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 08:39 IST

Aditya Thackeray Criticize Eknath Shinde: ठाकरे गटाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या या भावूक भाषणावर घणाघाती टीका केली आहे. गद्दार आणि खोटारड्यांवर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकत नाही त्यामुळे ही रडारड चालली आहे असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

शिवसेनेच्या कोल्हापूर येथे झालेल्या महाअधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी भावूक भाषण केले होते.  मी एक बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलो, असे ते म्हणाले होते. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या या भावूक भाषणावर घणाघाती टीका केली आहे. गद्दार आणि खोटारड्यांवर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकत नाही त्यामुळे ही रडारड चालली आहे असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या भावूक भाषणावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, गद्दार आणि खोटारड्यांवर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळेच ही सगळी रडारड चालली आहे. खोटं बोलायचं हे त्यांचं धोरण आहे. त्यांच्याकडे कुणीही लक्ष देणार नाही. ज्यांनी त्यांना घडवलं, त्यांना मंत्रिपद दिलं,  सगळं काही दिलं. त्यांच्याच पाठीत जो माणून खंजीर खुपसू शकतो, ते किती काळ्या मनाचे आहेत आणि त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे तुम्ही ठरवा, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. 

दरम्यान, मुंबईत झालेल्या सभेमधूनही आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली होती. ते म्हणाले की, 'गद्दारांनी आता सुद्धा काहीतरी रडारड केली आहे. पण तुमच्यावर असलेला गद्दार आणि बापचोर हा टॅग कधीच पुसली जाणार नाही. महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातमध्ये  पळवले जाताहेत. मुंबईच्या रक्ता रक्तात क्रिकेट असताना वर्ल्डकप फायनल कुठे झाली तर गुजरातला झाली. जर तो सामना मुंबईत झाली असती तर वेगळा निकाल लागला असता, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.  

यावेळी केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईवरही आधित्य ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले की, आज या गद्दारांविरोधात किशोरी पेडणेकर, राजन साळवी, सूरज चव्हाण लढत आहेत. संजय राऊत तर तुरुंगात जाऊन आले आहेत, आता तर ते कोणाला घाबरत नाही आहेत. दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी केंद्रीय संस्थांचा वापर केला जातोय. उद्या तुमच्या घरीसुद्धा  ईडी, सीबीआय घेऊन येतील, पण आपण घाबरायच नाही. आपण एक होऊन मुंबईकर होऊन लढायचं आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना