शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

खलनायकी प्रवृत्तीला हद्दपार करू या, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 13:12 IST

सेनापती कापशी : आजपर्यंत जनतेने मला संधी दिली, म्हणून माझ्या हातून ७५० देवालयांचा जिर्णोद्धार करण्याचे भाग्य मिळाले. कामगार खात्याच्या ...

सेनापती कापशी : आजपर्यंत जनतेने मला संधी दिली, म्हणून माझ्या हातून ७५० देवालयांचा जिर्णोद्धार करण्याचे भाग्य मिळाले. कामगार खात्याच्या माध्यमातून मतदारसंघात बांधकाम कामगारांच्या मुलांना ४८ कोटी रुपये शिष्यवृत्ती मिळाली. अशा विकासकामाच्या जोरावर गोरगरिबांची सेवा करण्याची संधी मिळाली. परंतु, मला तुरुंगात टाकून आणि कुटुंबीयांना छळून स्वतः आमदार होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या खलनायकी प्रवृत्तीला हद्दपार करू या, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.चिकोत्रा (ता. कागल) येथील आलाबादसह, अर्जुनवाडा, नंद्याळ, तमनाकवाडा येथील प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, चिकोत्रा, नागणवाडी, आंबेओहळ प्रकल्पांचा पाठपुरावा केल्याने वंचित गावांना कायमस्वरूपी पाण्याची सोय झाली. चिकोत्रा खोऱ्यात हिरवाई आणल्याचे मला समाधान वाटत आहे. येथून पुढेही जनतेची सेवा करण्याची मला संधी द्यावी.अंबरीष घाटगे म्हणाले, संजय घाटगे यांनी मंत्री मुश्रीफ यांच्याशी संघर्ष केला. पण, त्यामध्ये व्यक्तिगत कटुता अजिबात नव्हती. मात्र, समरजीत घाटगे यांनी ईडीचा ससेमिरा लावला. घरातील महिलांना त्रास देऊन आमदार होण्याच्या या राक्षसी महत्त्वाकांक्षी प्रवृत्तीला रोखले पाहिजे.

मधुकर करडे म्हणाले, समरजीत घाटगे अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहेत. शेतकऱ्यांची अडचण कधीच समजून घेतली नाही. ऊस तोडीत फार मोठा दुजाभाव केला जातो. गावातल्या माणसाला घेऊन गेल्याशिवाय काम होत नाही.आलाबाद येथे जोती मुसळे, सरपंच लताताई कांबळे, संतोष खराडे, एकनाथ कामते, तौफिक देसाई, ईश्वरा चौगले, सिद्धाप्पा गोरे, आनंदा सरवडे, तानाजी कामते तर तमनाकवाडा येथे सरपंच रंजना चौगले, उपसरपंच आक्काताई तिप्पे, डी. आर. चौगले, शिवाजी तिप्पे, दत्तात्रय चौगले, सौरभ तिप्पे, संजय चौगले, दयानंद साळवी उपस्थित होते.

दातृत्व असावे, तर मुश्रीफ यांच्यासारखेअर्जुनवाडाचे माजी सरपंच प्रदीप पाटील म्हणाले, अर्जुनवाडा गावातील मुले राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना खेळाचे साहित्य व प्रवास खर्चासाठी मंत्री मुश्रीफ यांनी ४५ हजार रुपये दिले. त्यांच्यासारखे दातृत्व दुसरे कोणाचे नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kagal-acकागलHasan Mushrifहसन मुश्रीफwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024