शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बारा बंधाऱ्यांचा अजून मुहूर्त नाही, विकासकामांची टिमकी कशाला वाजवता; के.पी.पाटील यांची आबिटकर यांच्यावर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 14:33 IST

टक्केवारीत जुळले नाही म्हणून..?

शिरगाव : मी आमदार असताना लोंढा नाला लघुपाटबंधारे तलावाखाली कोल्हापूर पद्धतीचे अठरा बंधारे मंजूर झाले. त्यापैकी तब्बल बारा बंधाऱ्यांच्या कामाला अजून तुम्ही सुरुवातही केली नाही. त्यामुळे मतदारसंघात विकासकामे केल्याची टिमकी कशाला वाजवता? अशी बोचरी टीका के. पी. पाटील यांनी प्रकाश आबिटकर यांच्यावर केली. शिरगाव (ता. राधानगरी) येथे महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.के.पी.पाटील म्हणाले, “धामोड परिसरातील डोंगराळ भाग सुजलाम्-सुफलाम् व्हावा यासाठी पाणी अडवण्याच्या हेतूने माझ्या काळात अठरा बंधारे मंजूर झाले होते. आमदारांनी त्यापैकी अवचितवाडीजवळचे काम दोन वर्षे रेंगाळलेल्या स्थितीत ठेवले असून बारा बंधाऱ्यांच्या कामाला अद्याप त्यांनी सुरुवातच केलेली नाही. तेथील शेतीसाठी या बंधाऱ्यांची गरज असताना त्याकडे कमालीचे दुर्लक्ष करणारे आमदार विकासकामांच्या मोठ्या गप्पा मारण्यात मश्गुल आहेत. विधानसभेत गेल्यानंतर मी हा प्रश्न प्राधान्याने हाताळणार आहे.”ज्येष्ठ नेते श्यामराव देसाई म्हणाले, “भुदरगड तालुक्यात आता आबिटकर विरोधी नाराजीची मोठी लाट तयार झाली असून, तेच वातावरण राधानगरी व आजरा तालुक्यांतही आहे.यावेळी ‘गोकुळ’चे संचालक आर. के. मोरे, भोगावतीचे माजी संचालक ए. डी. चौगले, दीपसिंह नवणे यांची भाषणे झाली. माजी सभापती संजय कलिकते यांनी स्वागत केले. सभेला ज्येष्ठ नेते पी. डी. धुंदरे, सदाशिवराव चरापले, धैर्यशील पाटील-कौलवकर, राहुल देसाई, सुरेश चौगले, संग्राम कलिकते, प्रसाद पिल्लारे, विजय व्हरकट, प्रशांत पाटील उपस्थित होते. बाजीराव महाडेश्वर यांनी आभार मानले.टक्केवारीत जुळले नाही म्हणून..?के. पी. पाटील म्हणाले, “मंजूर असलेल्या बारा बंधाऱ्यांच्या पायासाठी एक दगडही आमदारांच्या काळात रचलेला नाही. याबाबत परिसरातील शेतकरी अधिकाऱ्यांकडे चकरा मारत आहेत. टक्केवारीत जुळले नाही की काय..? म्हणूनच या कामांना सुरुवात झाली नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४radhanagari-acराधानगरीK P. Patilके. पी. पाटीलPrakash abitkarप्रकाश आबिटकरwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024