शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांच्याकडे ७७ लाखांचे सोने, एकूण मालमत्ता किती.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 13:45 IST

कोल्हापूर : माजी आरोग्यमंत्री दिवंगत दिग्विजय खानविलकर यांची कन्या आणि कोल्हापूरच्या राजपरिवारातील सून असलेल्या मधुरिमाराजे छत्रपती यांच्याकडे ७१९ ग्रॅम ...

कोल्हापूर : माजी आरोग्यमंत्री दिवंगत दिग्विजय खानविलकर यांची कन्या आणि कोल्हापूरच्या राजपरिवारातील सून असलेल्या मधुरिमाराजे छत्रपती यांच्याकडे ७१९ ग्रॅम वजनाचे ७७ लाख ०६ हजार ०३९ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असल्याचे निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. त्यांच्या नावावर जंगम व स्थावर अशी एकत्रित एक कोटी ९० लाख ९० हजार ०८८ रुपयांची मालमत्ता आहे.मधुरिमाराजे यांनी मंगळवारी कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जासोबत त्यांनी त्यांच्या संपत्तीविषयीचे प्रतिज्ञापत्रही निवडणूक आयोगाला सादर केले आहे. त्यात त्यांनी संपत्तीचे विवरण दिले आहे.मधुरिमा यांच्या नावावर विविध बँकांतून ३६ लाख ८६ हजार २०९ रुपयांच्या ठेवी आहेत. त्यांनी शेअर बाजारात सात लाख ८० हजार ७२६ रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या नावावर नऊ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहनदेखील आहे. ७७ लाख ०६ हजार ०३९ रुपये किमतीचे ७१९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्या वापरतात. याशिवाय त्यांच्या नावावर शेतीच्या रूपाने ५८ लाख ९९ हजार ११४ रुपयांची स्वत:चा अधिग्रहित मालमत्ता आहे.त्यांच्या नावावरील संपूर्ण मिळकतीचे एकूण मूल्य एक कोटी ९० लाख ९० हजार ०८८ इतक्या रुपयांचे आहे. त्यांचे गत सालातील उत्पन्न ८६ हजार ९५० रुपयांचे आहे. मधुरिमा या कला शाखेच्या पदवीधर आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरcongressकाँग्रेसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024