शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: करवीर मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 12:00 IST

कळे : करवीर विधानसभेचे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे प्रचारातून परतत असताना अज्ञातांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. त्यात ...

कळे : करवीर विधानसभेचे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे प्रचारातून परतत असताना अज्ञातांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. मानवाड येथे काल, रविवारी (दि.१७) रात्री सव्वा अकरा वाजता हा प्रकार घडला.घोरपडे हे जांभळी खोऱ्यातील मानवाड (ता.पन्हाळा) येथे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी गेले होते. परत येताना मानवाडलगत रस्त्याशेजारी सहा-सात अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. ते कार्यकर्ते असावेत किंवा काही त्यांना अडचण असावी असा समज होऊन त्यांनी गाडी बाजूला घेतली व गाडीतून उतरले असता त्यांनी क्षणाचा विलंब न करता काठी व धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात घोरपडे यांच्यासोबत असणारे डॉ. शुभम जाधव (मांडुकली, ता. गगनबावडा) हे खाली उतरले. गाडीमध्ये किती व्यक्ती आहेत याचा अंदाज न आल्याने संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला करून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शेतवडीतून पलायन करतेवेळी दगडफेक केली. त्यामध्ये गाडीचेही नुकसान झाले. घोरपडे यांच्या हाताला व डोक्याला गंभीर इजा होऊन रक्तस्त्राव झाला. त्यांना जवळच्या कळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले. यावेळी कार्यकर्त्यांना घडला प्रसंग समजताच गर्दी केली. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात हलविले. रात्री उशिरापर्यंत कळे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४karvir-acकरवीरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024