शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीत गुंता; करवीरच्या हट्टाने हातकणंगलेत मिठाचा खडा, शिंदेसेना आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 15:20 IST

जनसुराज्य कोड्यात

आयुब मुल्लाखोची : हातकणंगले विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने राजू आवळे यांची उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला. परंतु महायुतीतील संभ्रम वाढतच चालला आहे. शिंदेसेनेने मतांची बेरीज समोर ठेवून उमेदवारीचा हट्ट धरला आहे. शेवटच्या टप्प्यात गुंतागुंत वाढल्याने अखेर आमदार विनय कोरे यांनी गुरुवारी जनसुराज्य पक्षाची उमेदवारी अशोकराव माने यांना जाहीर केली. इचलकरंजीच्या माजी नगराध्यक्षा अलका स्वामी व माजी आमदार सुजित मिणचेकर यांची नावे शिंदेसेनेकडून पुढे आली आहेत. करवीरमध्ये कोरे यांनी जनसुराज्यचा उमेदवार उतरविल्याने शिंदेसेना हातकणंगलेसाठी आक्रमक झाल्याने महायुतीच्या एकीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.हातकणंगले मतदारसंघात अशोकराव माने यांनी जनसंपर्क ठेवल्याने तेच महायुतीचे उमेदवार असतील, असा होरा होता.परंतु गेल्या चार-पाच दिवसात महायुतीत नव्या घडामोडी सुरू झाल्याचे समोर आले आहे. शिंदे गटाने ही जागा मिळविण्यासाठी जोर धरला असून अलका स्वामी यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे जनसुराज्य व भाजपामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगले लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील माने यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमदार कोरे यांच्यावर टाकली होती. त्यानुसार विजय मिळाला. तेव्हापासून कोरे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या गुडबुकमध्ये समाविष्ट झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तर कोरे यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. अशी स्थिती असताना उमेदवारीचा गुंता कसा काय तयार झाला आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. करवीरमध्ये जनसुराज्यने संताजी घोरपडे यांना उमेदवारी जाहीर केल्याने मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे. तेथे शिंदे गटाने चंद्रदीप नरके यांना उमेदवारी दिली आहे.

लोकसभेला मताधिक्य मिळाल्याने शिंदेसेना आग्रहीहातकणंगलेत विधानसभा मतदारसंघात लोकसभेला मिळालेले मताधिक्य हे कारण पुढे करून शिंदे गट उमेदवारीसाठी आग्रही आहे. त्यामुळे अलका स्वामी यांचे उमेदवारीसाठी नाव पुढे करण्यात आले. त्यातच माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी महाविकासकडून उमेदवारी मिळणार नसल्याने शिंदे गटाशी संपर्क साधला आहे. गत निवडणुकीत त्यांना दोन नंबरची मते मिळवली होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळू शकते का याकडेही लक्ष लागले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४hatkanangle-acहातकणंगलेMahayutiमहायुतीEknath Shindeएकनाथ शिंदेVinay Koreविनय कोरे