शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

'बटेंगे तो कटेंगे' ला काँग्रेसचे 'पढेंगे तो बढेंगे' ने उत्तर - सुप्रिया श्रीनेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 13:21 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही

कोल्हापूर : महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांची भूमी आहे. हे राज्य जोडणारे आहे. त्यामुळे भाजपचा 'बटेंगे तो कटेंगे' हा नारा महाराष्ट्रात चालणार नाही. त्यांच्या या नाऱ्याला आम्ही 'पढेंगे तो बढेंगे' ने उत्तर देऊ, या शब्दांत काँग्रेस सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफाॅर्मच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया श्रीनेत यांनी बुधवारी भाजपचा समाचार घेतला.संविधानाच्या रक्षणासाठी महाराष्ट्रच पहिल्यांदा धावून आला असून पुढेही महाराष्ट्रच त्याचे रक्षण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र हा काँग्रेसचा डीएनए असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

फडणवीस यांनी माफी मागितली नाहीविधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात आलेल्या श्रीनेत यांनी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासमवेत पत्रकारांशी संवाद साधला. श्रीनेत म्हणाल्या, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजप हिंदू-मुस्लीम, भारत-पाकिस्तान यासारखे विषय मुद्दामहून आणत आहे. महाराष्ट्राशी काहीही देणेघेणे नसलेले प्रश्न उपस्थित करत आहे. मात्र, येथील जनता सजग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधानांनी ढोंगीपणा आणत माफी मागितली. देवेंद्र फडणवीस यांनी तर तीही मागितली नाही.

उद्योगांना कर्जमाफी पण शेतकऱ्यांची नाहीभाजपचा 'बटेंगे तो कटेंगे' हा नारा महाराष्ट्रात चालणार नाही. आम्ही 'पढेंगे तो बढेंगे' हा नारा घेऊन पुढे जात आहोत. सोयाबीन, कांदा यांचे भाव कोसळले आहेत. महाराष्ट्रात रोज ७ शेतकरी आत्महत्या करत आहेत. १६ लाख कोटींची उद्योगांना कर्जमाफी दिली, पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. हे सरकार कुणासाठी चालवले जात आहे, असा सवाल श्रीनेत यांनी उपस्थित केला.शहांना चर्चेचे खुले आव्हानइडी, सीबीआयला घाबरून काहीजण पक्षातून पळून गेले. मात्र, अशा वातावरणातही सतेज पाटील यांच्यासारखे शेर पक्षात राहून काम करत आहेत, असे सांगत श्रीनेत म्हणाल्या, अमित शहा यांनी नोकरी, रोजगार, महागाई, कारभार, महाराष्ट्र, अस्मिता, कोल्हापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर पाच मिनिट सतेज पाटील यांच्याशी चर्चा करावी. त्यांचा गळा सुकेल पण ते चर्चा करू शकणार नाहीत, कारण ते मुद्द्यांवर चर्चा करू शकत नाहीत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरcongressकाँग्रेसBJPभाजपाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024