शहरं
Join us  
Trending Stories
1
Brahmos Deal with Vietnam : 'ब्रह्मोस' भारताला आणखी मालामाल करणार, हा छोटासा देश चीनशी टक्कर घेणार; होणार 700 मिलियन डॉलरची डील!
2
"तुम मराठी लोग गंदा है...", घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...
3
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शनी देणार 'या' पाच राशींना अक्षय्य धनलाभ आणि कीर्ती!
4
ट्रम्प टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेची रिझर्व्ह बँकही चिंतेत; अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्यक्त केली मोठी भीती
5
भयंकर! ४०० प्रवाशांसह बोट नदीत उलटली, ५० जणांचा मृत्यू, १०० जण बेपत्ता
6
"मला मुलगी झाल्याने काही लोक निराश झाले", सोहा अली खानचा खुलासा; म्हणाली, "मी तर..."
7
"तुमचे १०० बाप झाली आले तरी..."; गरजला बाळासाहेबांचा 'एआय' आवाज; भारावले शिवसैनिक!
8
रोटी, कपडा और मकान नव्हे; आता हवेत लाइक, व्ह्यूज आणि सबस्क्रायबर
9
"मुस्लीम असून मी हिंदूशी विवाह केल्याने...", आंतरधर्मीय लग्नामुळे १० वर्षांनीही सोहा खानला करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना
10
नवऱ्याचा काटा काढला अन् बेडवर साप ठेवला, कारण...; बायकोचा विषारी प्लॅन, असा झाला पर्दाफाश
11
VIDEO: 'सुपर ओव्हर'मध्ये राजस्थानला होती जिंकायची संधी, पण 'फ्री हिट' मिस झाली अन् मॅच गमावली
12
सुरेश धस-धनंजय मुंडे आज एकत्र दिसणार?; शिरूर कासारमधील सोहळ्याकडे राज्याचं लक्ष
13
राज्यात आता रोबोट करणार मॅनहोलची सफाई, २७ महापालिकांसाठी १०० रोबोट
14
आयपीएलदरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई, सहाय्यक प्रशिक्षकांसह तिघांना पदावरून हटवलं!
15
"मी माझी फिल्म बघितली अन्.."; 'सुशीला सुजीत' सिनेमा पाहिल्यावर सोनाली कुलकर्णी काय म्हणाली?
16
जगातील निम्मे सोने असूनही बुडाला देश; अर्थव्यवस्था रुळावर यायला लागले तब्बल १२ वर्षे
17
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला मिळतील १६,६५० रुपये
18
Video - धक्कादायक! चालता बोलता 'तो' खाली कोसळला, सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यूचा संशय
19
जगभर : युक्रेनच्या स्त्रिया शिवताहेत ‘किकिमोरा वॉरसूट्स’, युद्धातील संघर्ष कथा
20
IPL 2025: हाच खरा 'मॅचविनर'! अवघ्या १२ चेंडूत मिचेल स्टार्कने फिरवला सामना, संघ विजयी

Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात बंदोबस्तासाठी आठ हजार पोलिस, जवानांचा फौजफाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 17:25 IST

कर्नाटक होमगार्डसह केंद्रीय सशस्त्र दलाचा सहभाग, उपद्रवी मतदान केद्रांवर सशस्त्र जवान

कोल्हापूर : विधानसभेसाठी बुधवारी (दि. २०) होणारे मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी स्थानिक पोलिसांसह राज्यातील विविध ठिकाणांहून आलेले पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे सशस्त्र जवान सज्ज झाले आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान ८ हजार १५७ पोलिस आणि जवानांचा खडा पहारा राहणार आहे. उपद्रवी केंद्रांवर सशस्त्र दलाचे जवान तैनात केले जाणार आहेत. मंगळवारी (दि. १९) दुपारीच बंदोबस्त मतदान केंद्रांकडे रवाना होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन केले आहे. जिल्ह्यातील उपद्रवी केंद्रांची स्वतंत्र यादी केली आहे. विशेषत: कागल, कोल्हापूर दक्षिण, उत्तर, इचलकरंजी या मतदारसंघांवर पोलिसांची करडी नजर आहे. सर्वच मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती होत असल्याने काही ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवण्याचा धोका आहे. यातील काही उपद्रवी केंद्रांवर पोलिसांसह केंद्रीय सशस्त्र दलाचे जवान तैनात केले जाणार आहेत.यापूर्वी निवडणुकांमध्ये वाद, गोंधळ झालेल्या गावांमधील राजकीय नेते, राजकीय गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही अधीक्षक पंडित यांनी दिला आहे.मतदान केंद्रांवर मोबाइल बंदीमतदारांना मतदान केंद्रावर मोबाइल घेऊन जाता येणार नाही. पोलिस आणि मतदान कर्मचाऱ्यांची नजर चुकवून कोणी मोबाइलवर मतदानाचे व्हिडीओ केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती अधीक्षक पंडित यांनी दिली. लोकसभा निवडणुकीत असे प्रकार घडल्याने यावेळी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.

असा असेल बंदोबस्त

  • कोल्हापूर पोलिस - २५५०
  • मुंबई, लोहमार्ग, तुरची प्रशिक्षण केंद्रातील पोलिस - ८००
  • कोल्हापूर होमगार्ड - ४४७
  • कर्नाटक होमगार्ड - ३३६०
  • (बेळगाव, बागलकोट, हसन, कोलार, कारवार, बंगळुरू, म्हैसूर येथील होमगार्ड)
  • सीएपीएफ - ६ कंपन्या
  • एसएपी - ३ कंपन्या
  • एसआरपीएफ - १ कंपनी
  • (प्रत्येक कंपनीत १०० जवान)
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkagal-acकागलradhanagari-acराधानगरीkolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणPoliceपोलिसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024