शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

ट्रक ड्रायव्हर केपी, तीन हजार कोटींचे मालक कसे झाले? प्रकाश आबिटकर यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 11:22 IST

Maharashtra Assembly Election 2024 : आबिटकर म्हणाले, के. पी. पाटील यांची कातडी गेंड्याची आहे. निगरगट्ट माणसाला समाजाचे कोणतेही देणे- घेणे नाही. निवडणूक आली की लोकांकडे जाऊन बुद्धिभेद करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायचा त्यांचा नेहमीचाच उद्योग आहे. 

Maharashtra Assembly Election 2024 : तुरंबे : हलगले, कोंडूशी, बोरवडे येथील शेकडो एकर जमीन तर मुदाळ येथील शिक्षण संस्था, बंगळुरूला आलिशान हॉटेल असणारे माजी आमदार के. पी. पाटील यांचा प्रवास एक ट्रक ड्रायव्हर ते तीन हजार कोटींचा मालक असा कसा झाला, अशी विचारणा आमदार प्रकाश आबिटकर यांनी ठिकपुर्ली येथील सभेत केली. आबिटकर म्हणाले, के. पी. पाटील यांची कातडी गेंड्याची आहे. निगरगट्ट माणसाला समाजाचे कोणतेही देणे- घेणे नाही. निवडणूक आली की लोकांकडे जाऊन बुद्धिभेद करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायचा त्यांचा नेहमीचाच उद्योग आहे. 

निष्क्रिय उमेदवार असलेल्या के. पी. पाटील यांनी आमदार असताना काय दिवे लावले हे स्वाभिमानी जनतेला चांगलेच ठाऊक आहे. मतदारसंघाचे कागल करतो अशी तोंडाची बाष्कळ वाफ घालवत त्यांचा कार्यकाळ लबाडी करण्यातच गेला. अरुणराव जाधव म्हणाले, ठिकपुर्ती गावातील एका मावशीने आमदार आबिटकर यांनी चांगले काम केले असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली; पण नेते मंडळी दबावतंत्र वापरत आहेत. के. पी. पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. 

अभिषेक डोंगळे म्हणाले, आबिटकर यांनी ठिकपुर्ली गावास नऊ कोटींहून अधिक निधी दिला असून के. पी. यांनी या गावास किती निधी दिला हे जाहीर करावे. यावेळी सरपंच प्रल्हाद पाटील, उपसरपंच शिवाजी साठे, माजी सरपंच राजेंद्र चौगले, चंद्रकांत संकपाळ, आनंदा पाटील, भिवाजी पाटील, हिंदूराव म्हाळुंगेकर, विजय चौगले, लहूजी जरग, सुरेश भोई, अमित चौगले, संग्रामसिंह चौगले, शहाजी कांबळे, साताप्पा कांबळे आदी उपस्थित होते. सुनील चौगले यांनी प्रास्ताविक केले.

धनशक्तीला जनता भीक घालणार नाही.. के. पी. पाटील यांना जनतेतून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांनी आता धनशक्तीचा वापर सुरू केला आहे मात्र राधानगरीची सुज्ञ जनता या आमिषाला बळी न पडता आबिटकर यांच्या पाठीशी राहील, असा विश्वास अरुण जाधव यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीPrakash abitkarप्रकाश आबिटकरK P. Patilके. पी. पाटील