महाडिक, पृथ्वीराज देशमुख यांनी घेतली फडणवीस यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 20:15 IST2020-12-28T20:11:43+5:302020-12-28T20:15:30+5:30

Devendra Fadnavis kolhapur- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी सकाळी मान्यवरांनी भेट घेतली. यामध्ये आमदार पृथ्वीराज देशमुख आणि धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. फडणवीस हे इस्लामपूर येथील शेतकरी मेळावा संपल्यानंतर आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे यांना भेटून रविवारी रात्री मुक्कामाला कोल्हापुरात आले होते.

Mahadik, Prithviraj Deshmukh met Fadnavis | महाडिक, पृथ्वीराज देशमुख यांनी घेतली फडणवीस यांची भेट

महाडिक, पृथ्वीराज देशमुख यांनी घेतली फडणवीस यांची भेट

ठळक मुद्देमहाडिक, पृथ्वीराज देशमुख यांनी घेतली फडणवीस यांची भेट अंबाबाईचे दर्शन घेऊन गोव्याकडे रवाना

कोल्हापूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी सकाळी मान्यवरांनी भेट घेतली. यामध्ये आमदार पृथ्वीराज देशमुख आणि धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. फडणवीस हे इस्लामपूर येथील शेतकरी मेळावा संपल्यानंतर आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे यांना भेटून रविवारी रात्री मुक्कामाला कोल्हापुरात आले होते.

सकाळी देशमुख, पाटील यांच्यासमवेत देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, गणेश देसाई यांनी फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर अंबाबाईचे दर्शन घेऊन ते गोव्याला रवाना झाले. आजरा येथे सुधीर परळकर, नाथा देसाई यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

 

Web Title: Mahadik, Prithviraj Deshmukh met Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.