महाडिक यांनी घेतली धैर्यशील मानेंची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:22 IST2021-04-06T04:22:48+5:302021-04-06T04:22:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’चे राजकारण तापू लागले आहे. रविवारी विरोधी आघाडीच्या दोन मंत्र्यांनी हातकणंगले, शिरोळमधील नेत्यांच्या गाठीभेटी ...

महाडिक यांनी घेतली धैर्यशील मानेंची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’चे राजकारण तापू लागले आहे. रविवारी विरोधी आघाडीच्या दोन मंत्र्यांनी हातकणंगले, शिरोळमधील नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर सोमवारी सत्तारूढ गटाचे नेते महादेवराव महाडिक यांनी खासदार धैर्यशील माने यांची भेट घेऊन सोबत राहण्याचे आवाहन केले.
‘गोकुळ’साठी दाखल अर्जांची छाननी सोमवारी झाल्याने दोन्ही आघाड्यांमधील अंतर्गत हालचालीने वेग घेतला आहे. रविवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी आमदार प्रकाश आवाडे, राजू आवळे, संध्यादेवी कुपेकर, उल्हास पाटील, सावकर मादनाईक आदींच्या गाठीभेटी घेऊन विरोधी शाहू आघाडीसोबत राहण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सोमवारी सकाळीच महादेवराव महाडिक यांनी खासदार धैर्यशील माने व माजी खासदार निवेदिता माने यांची भेट घेऊन सत्ताधारी गटासोबत राहण्याची विनंती केली. यावेळी राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, वडगाव बाजार समितीचे माजी सभापती सुरेश पाटील, आदी उपस्थित होते. आगामी काळात गाठीभेटींचा सिलसिला वाढणार असून, पाठिंब्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न राहणार, हे निश्चित आहे.